बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात आढलेल्या फोनचा पोलिस पोलिस काढणार सीडीआर; त्यात सीमकार
बीड: काही दिवसांपूर्वी बीड (Beed Crime News) जिल्हा कारागृहात आढळून आलेल्या मोबाइलमध्ये (Mobile) सिमकार्ड नाही. त्यात आता हा मोबाइल वाल्मीक कराड (Walmik Karad) वापरत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे पोलिस आयएमईआय क्रमांकावरून या मोबाइलचा सीडीआर काढणार आहेत. त्या दृष्टीने पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Beed Crime News)
बीड जिल्हा कारागृहात 23 जुलै रोजी रफिक खुर्शिद सय्यद नावाच्या कैद्याकडे एक छोटा मोबाइल आढळून आला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान, कारागृहातील या मोबाइलवरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बीड कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आहे. त्यामुळे या मोबाइलचा सीडीआर काढावा, अशी मागणी सुरुवातीला धनंजय देशमुख यांनी केली. (Beed Crime News)
त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही आपल्यासमोर एका व्यक्तीला कारागृहातून वाल्मीक कराडचा फोन आला होता, असा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी हा मोबाइल आकाचाच असल्याचा दावा केला होता. आता शिवाजीनगर पोलिसांनीही मोबाइल प्रकरणात तपासाला गती दिली. या मोबाइलमध्ये सिमकार्ड नव्हते. विनासिमचा हा मोबाइल होता. त्यामुळे त्याच्या आयएमईआय क्रमांकावरून कोणत्या कंपनीचे सिमकार्ड होते, त्याच्यावरून कुणाला फोन केले गेले? याची माहिती मागवली जाणार आहे. (Beed Crime News)
धनंजय देशमुखांची नवनीत काँवत यांच्याकडे मागणी
बीड जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड याने 10 जुलै रोजी फोनवरून कोणाकोणाला संपर्क साधला याची चौकशी सीडीआर काढून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मस्साजोग येथील धनंजय देशमुख यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे केली आहे.(Beed Crime News)
झडती घेताना कैद्याकडे आढळला फोन
वाल्मीक कराड कोठडीत असलेल्या बीडच्या जिल्हा कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळला आहे. याप्रकरणी कैद्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रफिक खुर्शीद सय्यद असे मोबाईल आढळून आलेल्या कैद्याचे नाव असून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील तो आरोपी आहे. कारागृहात त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने कारागृह प्रशासनाने त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे विना सिम कार्डचा एक मोबाईल आढळून आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.