महिलेचं तोंड दाबून गळ्यातले दागिने ओरबाडले, पतीच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार,बीडमध्ये गुन्ह
बीड गुन्हा: बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन घटनांनी संपूर्ण बीड जिल्हा हादरलाय .वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे . दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, शस्त्राचा धाक दाखवून होणारी मारहाण, दरोडे, लैंगिक अत्याचार अशा घटना जिल्ह्यातून वारंवार समोर येत आहेत . दरम्यान शिरूर तालुक्यातील मानूर जवळील तुपे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकत पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावत भगवान तुपे यांच्या घराचे दार तोडूनच प्रवेश केला .त्यांच्या पत्नीचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले . नंतर पतीच्या डोक्यातही धारदार शस्त्राने वार करून डोके फोडले . गळ्यातील मंगळसूत्रासह घरातील दोन तोळे दागिने घेऊन चोरटे पसार झाले . महिलेच्या पाकिटातील रोख दहा हजार रुपयेही चोरट्यांनी लंपास केले .या संपूर्ण घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे .
नेमकं घडलं काय?
बीडच्या शिरूर तालुक्यातील मानूर जवळील हनुमानवाडी येथील तुपे वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी पती पत्नीला बेदम मारहाण करून लुटमार केली. या घटनेत भागवत तुपे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मध्यरात्री तीन चोरांनी तुपे वस्तीवरील आजुबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून भागवत तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. या वेळी भागवत तुपे यांच्या पत्नी सरस्वती यांचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र काढले. तसेच बाजूला झोपलेले पती भागवत तुपे जागे झाल्याने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून डोके फोडले.
सरस्वती यांच्या पाकिटातील रोख दहा हजार रुपये आणि गळ्यातील तसेच घरात ठेवलेले दोन तोळ्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.. या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे..
शेत जमिनीच्या वादातून महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घातला
बीडच्या शिरूर तालुक्यातील राक्षस भवन थांबा येथे शेतीच्या वादातून दोन गटात मोठा वाद झाला .या वादात महिला शेतकरी सीमा खोले यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला .या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर तीन जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सीमा खोले यांच्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या नावे असलेली शेतजमीन त्या वैती करतात.. मात्र याच जमिनी वरून भावकीतील दीपक खोले नानासाहेब तांबे आणि रामेश्वर अवसरमल यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. आणि याच घटनेत महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून बेल्टने मारहाण झाली. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.