शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट; समाधान मुंडेला बदडणाऱ्या भागवत साबळे,सुरेश साबळेसह आ

बीड/परळी – परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिवटेला मारहाण करणारा समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. या प्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच शिवराज  दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता या प्रकरणात  नवा ट्विस्ट समोर आला आहे.

बीडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्याची घडली होती, या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्या विरोधात समाधान याच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरी याला सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने काठी लाथा बुक्क्या व बेल्टने मारहाण केल्याची या तक्रारीत म्हटले आहे.आता या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी हे शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी असून आता या दोघांना मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात समाधान मुंडेच्या आईने तक्रार केली आहे, जलालपूरमध्ये मारहाण झाली होती, त्यानंतर आता शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट आला आहे. 16 मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यासाठी शिवराज दिवटे (वय 18, रा. लिंबोटी, ता. परळी) हा मित्रांसोबत गेला होता. त्याठिकाणी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर पायाही पडायला लावले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवराजच्या जबाबावरून 20 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, सातजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी  समाधान मुंडेलाही जलालपूरमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला होता.

शिवराज दिवटे मारहाण प्रकरण काय?

परळीतील गुन्हेगारांच्या एका टोळक्याने आपल्या भांडणात सहभागी असल्याच्या संशयावरून एका तरुणाला उचलून जवळच्या निर्जनस्थळी जंगलात नेलं. तेथे त्याला 18 ते 20 जणांनी लाठ्याकाठ्या, बेल्ट, रॉडने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी( ता,16) दुपारी परळीजवळील रत्नेश्वर मंदिराच्या आवारातील जंगलात घडली. विषेश म्हणजे आरोपींनी या मारहाणीचा व्हिडीओही बनवला. शिवराज नारायण दिवटे (वय 18) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी आंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील पाच आरोपींना २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे (रा. डाबी), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी दहा आरोपी फरार आहेत.

अधिक पाहा..

Comments are closed.