जिवलग मैत्रिणीच्या प्रियकरावर जडलं प्रेम; सख्ख्या मैत्रिणीनेच मैत्रिणीला संपवलं, बॉक्समध्ये भरल
बीड: रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नातं सर्वश्रेष्ठ असते.. हे अनेक काव्यपंक्तीतून समोर आले. मात्र मैत्रीचं नातं बीडमध्ये कलंकित झाले आहे. प्रियकरावर डोळा ठेवल्याने मैत्रिणीने मैत्रीणचा गळा दाबून खून केला. एखाद्या चित्रपटातील कथानकालाही मागे टाकेल अशा क्रूर घटनेने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे.
बीडमधील त्रिकोणी प्रेमाची क्रूर कहानी
बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी महिलेच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत… तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिने केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापाचा लवलेश देखील दिसून येणार नाही…माझ्या प्रियकरावर का प्रेम केलंस? म्हणून सख्ख्या मैत्रिणीचा तिने गळा दाबून खून केलाय.. सिनेमातल्या कथानकाला देखील मागे पाडेल अशी क्रूर घटना या आरोपी महिलेने केली.. बीडच्या अंबिका चौक परिसरात वृंदावनी फरताळे या आरोपी महिलेचे घर आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात होमगार्ड पदावर असलेल्या आयोध्या व्हरकडे आणि वृंदावनी फरताळे या दोघींची मैत्री जमली.
ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट…
दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले…. मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती… आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची झाली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली.
तीन दिवसापासून फोन बंद
आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. काल सायंकाळी आयोध्याच्या मृतदेचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र अद्याप त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळेच पोलिसांनी तात्काळ अहवाल मिळवून घटनेची शहानिशा करून यात किती आरोपी आहेत? याचा उलघडा करावा अशी मागणी मयत होमगार्ड महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
मैत्रीचं गाणं गाताना,
शब्द माझे अडखळले.
तुझ्यासोबत असताना,
मन माझं मोहरले.
तुझा हात हातात होता,
अन् विश्वास डोळ्यांत.
कधीच वाटलं नव्हतं,
फसवशील एका क्षणात.
आज ती गाथा विसरली,
ज्याला ‘मैत्री’ म्हटलं.
अश्रूंनी डोळे भरले,
जेव्हा तुझं रूप कळलं.
या काव्यपंक्तीतले हे शब्द ऐकून तुमच्या अंगावर शहारा आला असेल.. मृत्यूनंतर मात्र आयोध्या यांच्या आत्म्याने कदाचित हेच बोल पुटपुटले असतील… त्यामुळे मित्रत्व करत असताना चाहू बाजूने विचार केला पाहिजे… मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करणं एवढं महागात पडेल अस आयोध्याला कधीच वाटलं नव्हतं. प्रेमाच्या या गणिती काटकोन त्रिकोणातील प्रेमाचा अंत एवढा भयान आणि भीषण होईल.. याचा स्वप्नात विचार देखील केला नाही आणि याच घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=1gciquya-4k
आणखी वाचा
Comments are closed.