विलास घुले हत्याकांड प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा लक्ष्मण हाकेंना फोन; खासदार बजरंग सोनवणेंच्य
बीड विलास घुले प्रकरण: केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले (Beed Vilas Ghule Case) या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गेले तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. अशातच मंगळवारी विलास घुले यांचा मृतदेह नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला होता. या एकंदरीत प्रकरणात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणी आज माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मृत विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून शिक्षा व्हावी, याबाबत लेखी स्वरूपात धनंजय मुंडे यांनी निवेदन दिले.
दरम्यान, कालावधी (२३ जूनच्या) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती हाके यांनी दिली. यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. यानंतर रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. तसेच या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी उपस्थित नातेवाईकांना दिले. तर रात्री उशिरा 11.00 वा.आंदोलन स्थगित करत विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.
SP Navneet Kanwat : खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्रालाही अटक? पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले…
दरम्यान, या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत होते. त्यानुसार आता पुरवणी जबाब घेण्यात आला असून यामध्ये चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनी दिलीय. केज तालुक्यातील विलास घुले या तरुणाची चाकूने भोसकावून हत्या करण्यात आली. आरोपींना अटक करा या मागणीसाठी तब्बल 9 तासापासून मृतदेह केज पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल होता. ग्रामस्थ तथा नातेवाईकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके देखील सहभागी झाले होते. हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले असून रात्री 11.00 वा घुले यांच्या मृतदेह त्याच्या गावात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.
Dhananjay Munde : विलास घुले यांना न्याय मिळावा, धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणी आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कै. विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना तअटक करून शिक्षा व्हावी, याबाबत लेखी स्वरूपात निवेदन दिले.
संपूर्ण प्रकरणात सर्व बारकावे तपासून वस्तुनिष्ठ व सर्व बाजूंनी तपास केला जावा व पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील दोषींना शासन कठोर शिक्षा करेल,असे आश्वासन मुंडेना दिले आहे. सदर हत्या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा ढवळून निघाला असून, धनंजय मुंडे यांनी आज सकाळी विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक जोमाने तपासात सक्रिय झाली असून आतापर्यंत या प्रकरणात नऊ पैकी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अजूनही हजारो लोक केज पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले असून न्यायासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.