‘भाई तुम बडे, भाई सॉरी सॉरी…’; जितेंद्र आव्हाडांनी फोनवर माझी मागितली होती; गोट्या गित्तेचा व

Gotya Gitte and Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. फोनवर त्यांनी माझी मागितली होती. फोनवर तू”भाई तुम बडे, भाई सॉरी सॉरी…’,असे म्हणत होतास, असा दावा वाल्मिक कराडचा (Walmik Karad) चेला असलेल्या गोट्या गित्ते याने केला आहे. गोट्या गित्ते (Gotya Gitte) याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला होता. यामध्ये तो रेल्वे ट्रेनच्या रुळांवर बसलेला दिसत आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांना धमकी दिली आहे.

या व्हिडीओत गोट्या गित्ते याने म्हटले आहे की, ‘एsss जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ. माझ्याकडे तुझी कॉल रेकॉर्डिंग आहेत. तू नेमका कोणाचा आहेस?  तू वंजारी समाजाचा नाहीस. तू हे जे वागतोय ते तिला खूप महागात पडणार आहे, असा इशारा गोट्या गित्ते यांनी आव्हाडांना दिला.

बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणात (Mahadev Munde Murder Case) सध्या पोलिसांकडून गोट्या गित्तेचा शोध घेतला जात आहे. मात्र, तो फरार आहे. शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. गोट्याने 16 जानेवारीचा जुना व्हिडीओ पोस्ट केल्याचे समजते. परळी जवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे पटरीवरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने वाल्मिक कराड हा आपले दैवत असल्याचे म्हटले आहे. माझे वाल्मिक कराडसोबत संबध असल्याचं बोललं जात आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. बाकी आमचा काहीही संबंध नाही. पण आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे हे आरोप करत आहेत. तसेच अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेत. कोणच्याही मुलींना उचलून नेतो. वंजारी असूनसुद्धा मला जितेंद्र आवाड यांची लाज वाटते. ते म्हणतात की, मी कोणत्यातरी मंदिराचा मुखवटा चोरला. माझ्यावर खूप गुन्हे दाखल होत आहेत. विनाकारण, दरोडे, खून, खंडणी असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. फुकट आरोप माझ्यावर करु नका. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत, असे गोट्या गित्ते याने म्हटले. यावर आता आव्हाड काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=8lceflavf00

आणखी वाचा

वाल्मिक कराड दैवत, धनंजय मुडेंना टार्गेट करु नका, फरार गोट्या गित्तेचा व्हिडीओ व्हायरल

सनातन धर्म विकृत, भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य; भाजपकडून टीकेची झोड

आणखी वाचा

Comments are closed.