बीडच्या कारागृहात धर्मांतरासाठी मारहाण; भजन, आरती, नमाज पठण केलं बंद; वकिलांनंतर आता जामिनावर ब


बीड गुन्हा: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह (Beed Jail) अधीक्षकांवर गंभीर आरोप केला होता. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केला होता. या पाठोपाठ बीडच्या कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन (conversion) करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला होता. आता बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Beed Crime: भजन, आरती, नमाज पठण बंद केले

कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड कारागृहात रुजू झाल्यापासून त्यांनी कारागृहातील भजन, आरती आणि नमाज पठण बंद केले. तसेच कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी गायकवाड दबाव टाकतात. तर ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी पैशांचे आमिष देखील दाखवितात असा आरोप खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या कल्याण भावले या कैद्याने केला आहे.

Beed Crime: कारागृहात धर्मांतरासाठी मारहाण

तसेच, जळगाव येथील ज्योती जगताप या महिलेने बीडमध्ये येऊन गायकवाड यांच्यावर आरोप केले आहेत. 2020 साली जळगावच्या कारागृहात ज्योती जगताप यांच्या पतीच्या हत्येचा गुन्हा गायकवाड यांच्यावर आहे. गायकवाड यांनी ज्योती यांचे पती रवींद्र जगताप यांना धर्मांतर करण्यासाठी दबाव आणून मारहाण केली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात गायकवाड यांच्यासह पाच जणांवर खुनाचा गुन्हा नोंद आहे. आणि हाच गुन्हा मागे घेण्यासाठी 40 लाखांची ऑफर देखील दिल्याचं ज्योती जगताप यांनी दावा केला. दरम्यान या दोघांच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच कारागृहात जाऊन त्यांची भेट घेण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांचा आरोप

दरम्यान, गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, बीडचे तुरुंग अधिकारी धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबलमधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन, कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकले आहे. तसेच तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेटायला येतो. कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा, तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत. बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Beed Crime News : बॅटने मारहाण करणारा खोक्या सुटला, सतीश भोसलेला चार महिन्यांनी जामीन मंजूर!

आणखी वाचा

Comments are closed.