संतापजनक ! सातवीतल्या मुलीचं लग्न लावलं, नंतर आईचेच जावयासोबत अनैतिक संबंध, दोघांनी मिळून ..

बीड गुन्हा: बीडमधून एक संतापजनक प्रकार समोर आलाय. सातवीतल्या मुलीचं घरच्यांनी लग्न लावून दिलं . नंतर मुलीच्या आईनंच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले. दुसरीकडे पतीने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीनं शारिरीक संबंध ठेवल्याचं तिने सासूला सांगितलं पण सासूनेही अल्पवयीन मुलीलाच जबरदस्ती केल्याची घटना घडलीय . शेवटी मुलीने धारूर पोलिसांकडे घटनेची तक्रार नोंदवल्यानंतर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 2017 मध्ये पीडित मुलीचे लग्न धारूर मधील एका मंदिरात तिच्या घरच्यांनी लावून दिले होते . मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून मुलीने 2022 मध्ये आजी आजोबांचं घर गाठलं . नंतर एका सेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांना हा सगळा प्रकार पीडित मुलीने सांगितल्यानंतर तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय .

नेमकं प्रकरण काय ?

बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचे तिच्या आई आणि नातेवाईकांनी लग्न लावून दिले .त्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचे उघड झालं आहे .सातवी शिक्षण घेत असताना मनाविरुद्ध लग्न लावून दिल्याचे तक्रार पीडित मुलीने धारूर पोलिसांना केली .

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आई सोबत राहत होत्या .2016 मध्ये त्यांचे वडील घर सोडून गेले होते .2017 मध्ये मुलगी सातवी इयत्तता शिकत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूर मधील एका मंदिरात लावून दिले .हे लग्नाला मुलीचा विरोध होता पण आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू या सगळ्यांनी तिचं लग्न लावले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे .काही दिवसांनी अल्पवयीन मुलीस तिच्या सासरी नांदायला पाठवले तेव्हा पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले .याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता त्या दोघींनीही त्याच्यावर बळजबरी केली, असा आरोप फिर्यादित आहे .या प्रकरणात नंतर मुलीने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला .तू आम्हाला बदनाम करत आहेस असे म्हणत पती आणि आई दोघे मिळून अल्पवयीन मुलीच त्रास देऊ लागले .शेवटी या दोघांच्या त्रासाला कंटाळून गेली आजी आजोबांचं घर गाठलं . या त्रासातून सुटका व्हावी यासाठी पीडित मुलीने शेवटी अंबाजोगाई ला जात मानव लोक सेवाभावी संस्थेच्या अधिकारी अरुंधती पाटील यांना सर्व हकीकत सांगितली .त्यानंतर हे सगळा प्रकार समोर आला .हा घडलेला सर्व प्रकारानंतर तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे .

आणखी वाचा

Comments are closed.