बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात मोठी अपडेट; दोन्ही शिक्षकांची न्यायालयीन कोठडी
बीड गुन्हा: अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही शिक्षक आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना आज बीड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. या प्रकरणात या दोघांना यापूर्वी दोन दिवसांची आणि त्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.
आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांचे जबाब नोंदवले असून पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा समावेश आहे. पोलिसांनी खाटोकरची दुचाकी जप्त केली असून दोघांचे मोबाइल, टॅब, लॅपटॉपही जप्त केले आहेत. तर क्लासमध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे डीव्हीआर जप्त केले आहेत. पोलिसांनी या घटनेतील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहे. तसेच 30 पेक्षा अधिक जणांचे जबाब देखील नोंदवले आहेत. आज प्रशांत खाटोकर व विजय पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपासासाठी पोलिसांकडून पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. बीडमधील या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
उमाकिरण शैक्षणिक संकुलात नीटची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्यावरुन संचालक विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर या दोघांवर पोक्सोनुसार गुन्हा नोंद आहे. सध्या दोघेही पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षकांकडून शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे सोपविण्यात आला.बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रात्र घालविलेल्या पवार, खाटोकरला शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. इथे दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून त्यांचा सीडीआर तपासला जात आहे. तसेच इंटरनेटचा वापर करुन काही कृत्य केले का, याबाबत तपास अधिकाऱ्यांनी इंटरनेट वापरकर्त्यांनाही पत्र दिले आहे.
बीडमध्ये बाललैंगिक अत्याचारांचे 78 गुन्हे
बीडमध्ये शाळा, क्लासेस आणि अगदी घरातही मुली असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक दोन दिवसांनी एक बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याची जिल्ह्यात नोंद होतेय. मागील पाच महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे तब्बल 78 गुन्हे नोंद झालेत. यातील 42 गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे तर 36 गुन्हे विनयभंगाचे आहेत. धक्कादायक म्हणजे पाच महिन्यांत एकूण बलात्काराच्या घटनांमध्ये 49 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.