वडिलांनी दुपारी अखेरचा फोन केला; रात्री यश रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, जवळ घेऊन विचारल
बीड: बीडमध्ये एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यात चाकूने भोसकून खून (Beed Crime News) करण्यात आला. यश ढाका हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरले (Beed Crime News) असून या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड येथील माने कॉम्पलक्स परिसरात यशवरती वार करून त्याला संपवलं (Beed Crime News) गेलं. मित्राने बाचाबाचीत चाकूने छातीत सपासप वार करून त्याचा खून केला होता. या घटनेत मृत्यू झालेल्या यश ढाका याच्या वडिलांनी बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे हजर येऊन तक्रार दाखल केली आहे. (Beed Crime News)
पत्रकार देवेंद्र ढाका (वय 45 वर्षे रा. बलभीम नगर पेठ बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्याचे कुटुंब बीड येथे वास्तव्यास असून ते खाजगी नोकरी करून घर चालवतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा यश ढाका (वय 20 वर्षे), लहान मुलगा युवराज देवेंद्रसिंग ढाका (वय 17 वर्षे) अशी दोन मुलं आहेत.
Yash Dhaka Murder Case : रात्री 08.30 वाजेच्या सुमारास फोन आला अन्….
देवेंद्र ढाका यांनी या प्रकरणी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी नेहमीप्रमाणे 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कामानिमीत्त घराबाहेर पडलो. त्यावेळी माझा मुलगा यश हा घरीच होता दुपारी 02.45 वाजण्याच्या सुमारास मी मुलगा यश याला फोन करुन युवराज याला MIDC येथून घरी घेऊन येण्याबाबत सांगितलं असता यशने मला कळविले की माझ्याकडे गाडी नाही मी बाहेर आहे. यावर मी त्याला बोललो की ठीक आहे, मी दुसऱ्याला कोणाला तरी पाठवतो, असं म्हणून फोन कट केला. रात्री 08.30 वाजेच्या सुमारास बस स्थानक बीड येथे असताना मला माझे चुलत भाऊ अमरसिंग ढाका यांचा फोन आला आणि त्यांनी सांगीतले की यशवर माने कॉम्पलेक्स येथे वार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर ते तात्काळ माने कॉम्पलेक्स बीड येथे पोहचले, गणेश वॉशिंग कंपनी समोर रोडवर माझा मुलगा यश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
Yash Dhaka Murder Case : त्याचा शर्ट, पॅन्ट रक्ताने माखलेले
त्यावेळी त्याच्या आजुबाजुला लोकांची गर्दी जमली होती. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला जवळ घेतले असता त्याचे छातीवर डाव्या बाजुस धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते व त्याचा शर्ट, पॅन्ट रक्ताने माखलेले होते. मी त्याच्याशी बरेच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तो काहीच बोलला नाही. तो पर्यंत त्याच्या मित्रांनी रुग्णवाहिका कॉल केलेला होता. तेव्हा तेथे त्याचे दोन मित्र हजर होते त्यांनी मला सांगितले की सुरज आप्पासाहेब काटे व त्याचे सर्व साथीदाराने यशला धारदार शस्त्राने वार केले आहेत. तेथे थोड्याच वेळात रुग्णवाहिका आली व आम्ही त्यास रुग्णवाहिकेतून सरकारी दवाखाना बीड येथे घेऊन गेलो, तेथे डॉक्टरांनी यशला तपासले आणि त्याचा मृत्यू झाला असल्याचे आम्हाला सांगितलं.
ढाका यांच्या तक्रारीनुसार बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकूण पाच आरोपींवर 302अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे, एका आरोपीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. मात्र यातील आणखी चार आरोपी अद्याप ही फरार आहेत. या फरार आरोपींना ताब्यात घेण्यात यावे या करिता नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर भर पावसात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन ही केले होते. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यशच्या मारेकऱ्यांना शोधून अटक करू असे आश्वासन देखील दिले. यशच्या पश्चात त्याचा लहान भाऊ आई, वडील असा परिवार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.