रागाच्या भरात घरातून निघून गेला.., दोन दिवसांनी माजलगाव धरणात मृतदेह तरंगताना आढळला, कुटुंब हाद
पलंग: बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलेनगर परिसरातील तरुण मंदार वीरभद्र वाकळे याचा मृतदेह मंगळवारी सकाळी माजलगाव धरणात आढळून आला. दोन दिवसांपूर्वी तो रागाच्या भरात घरातून निघून गेला होता आणि त्यानंतर त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Beed News)
दोन दिवसांपूर्वी रागाने घराबाहेर पडला
मिळालेल्या माहितीनुसार, मंदार वाकळे याचे कुटुंब फुलेनगर परिसरात वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी घरात किरकोळ कारणावरून काही वाद झाल्यानंतर तो रागाच्या भरात घरातून बाहेर पडला. त्याने मोबाईल फोन घरीच ठेवला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ ठरला. संध्याकाळ झाली तरी मंदार परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे चौकशी करूनही त्याचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
मृतदेह धरणात तरंगताना आढळला
मंगळवारी सकाळी काही नागरिक माजलगाव धरणाच्या परिसरात गेले असता, त्यांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. घटनास्थळी माजलगाव पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख मंदार वाकळे अशी पटली. मृतदेह ओळख पटताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मंदारच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो अपघाताने पाण्यात पडला की आत्महत्येचा प्रयत्न केला, याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत.
दोन मित्रांनी मिळून मित्राचाच काटा काढला
छत्रपती संभाजीनगर शहर दिवाळीच्या दिवशी हादरले असून रामनगर भागात एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचं समोर आलं. विपुल चाबुकस्वार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे असे हत्या करणाऱ्यांची नावं आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी आशिष चौतमलने चाकू भोसकताना CCTV समोर आला आहे. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.