संतापजनक… घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या

बीड: तालुक्यातील (Beed) एका गावामध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवले गेले. हा सगळा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी या विवाहितेची सुटका केली. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करत आरोपी वैभव पटेकर याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बीड जिल्ह्याच्या हिवरापाडी येथील अल्पवयीन विवाहितेवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. 11 मार्च रोजी आपल्या घरी झोपली असता गावातील वैभव पटेकर याने पीडितेला उचलून नेते नदीकडील परिसरात नेऊन अत्याचार केला. दरम्यान, घरातून नेतानाच पीडितेने विरोध केला असता, तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने नेण्यात आले. अत्याचारानंतर गावातील चावडीवर असलेल्या खांबाला बांधून तो पळून गेला. सकाळी ग्रामस्थांनी पीडितेला खांबाला बांधलेलं पाहिले असता ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी घटनेचा व्हिडिओ बनवला असून तोही माध्यमांत समोर आला आहे.

गावचे सरपंच, गावातील ज्येष्ठ आणि कुटुंबातील सदस्य आल्यानंतरच या महिलेची खांबापासून सुटका करण्यात आल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार हिवरापाडीत घडला आहे. घडल्या प्रकाराने विवाहिता प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिने पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली नाही. त्यानंतर, आज कुटुंबीयांना ही घटना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर पीडित अल्पवयीन विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जातोय. परंतु या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडिता ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा

200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन

आणखी वाचा

Comments are closed.