Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?

Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
बीड मध्ये सहकारभवनच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.. यावेळी पूजेसाठी बसलेल्या अजित पवारांना पुरोहिताला दक्षिणा देण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढत शेजारी असलेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली.. संदीप क्षीरसागर यांनी ती नोट आमदार विक्रम काळे यांच्याकडे दिली.. विक्रम काळे यांनी ती नोट अजित पवार यांना देण्याचा प्रयत्न केला असता अजित पवारांनी ती नाकारली आणि नको म्हणून सांगितले.. यानंतर ही नोट पुन्हा विक्रम काळे यांनी संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आणि संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा ती बजरंग सोनवणे यांच्याकडे दिली.. बजरंग सोनवणे यांनी गेलेले पैसे परत आले म्हणत आपल्या खिशात ठेवून दिले.. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत असून याची चर्चा रंगू लागलीय..

बीड व्हिडीओ

Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?

आणखी पाहा

Comments are closed.