‘धनंजय मुंडेंना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर…’, अंजली दमानिया बीड प्रकरणावरू
बीड: बीडमधील घडलेल्या गुन्हेगारीच्या घटना आणि समोर आलेले व्हिडिओ यामुळे राज्य हादरलं आहे. याचा मोठा फटका राजकीय वर्तुळाला बसत असल्याचं दिसून येत आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत’, आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरती सुरवातीपासून बीड प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेल्या अंजली दमानियांनी टीका केली आहे. इतकंच नाही, तर त्यांनी शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असाही सल्ला दिला आहे. त्यानंतर आज देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना दमानिया यांनी शरद पवारांना आधी जर नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या अन् तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं, असं म्हणत हे संगळ थांबवलं गेलं पाहिजे असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
का गोष्टी तुम्ही पाठीशी घातल्या
अंजली दमानिया आज माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं, काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या. का तुम्ही त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या होत्या? धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केलं, त्यांनी काय शिकवलं. आत्ता देखील मला जे तिसरा प्रकरण कळलं आहे, शिवसेना उबाठा गटाचे काय कारवाई करतील. ज्याप्रमाणे शिंदे गटातील व्यक्तींना मी सांगून तो बोर्ड उतरवला आणि त्यांचं घर त्यांना परत मिळवून दिलं, जर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळं बंद होईल. सगळ्या पक्षांना गरज आहे की, त्यांनी सगळ्यावर कारवाई करावी आणि जो चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे. जर हे होत नसेल, हे थांबत नसेल, तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी देखील मागणी करणे गरजेचे आहे असं म्हणत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं.
आता या सर्व प्रकरणांमध्ये कोणाची भेट घेण्यात मला काहीच अर्थ वाटत नाही. सगळ्यांची भेट घेऊन देखील तीन महिने कोणीच काही कारवाई केली नाही. आता मी कोणाचीही भेट घेणार नाही. मला फक्त वाटते की, हे सगळं थांबलं पाहिजे. गृहमंत्र्यांनी हे सगळं थांबवलं पाहिजे आणि पहिलं तर पूर्ण बीड पोलीस विभाग आहे त्याला बीड जिल्ह्याच्या बाहेर टाकून सर्व पोलिस स्टाफ नव्यांना आणण्याची गरज आहे आणि तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे, असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
बीड पोलिसांनी आपल्या नेमप्लेटवरती फक्त आपलं नाव लावायचं आडनाव लावायचं नाही यावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, तिथे सगळ्यांना सगळ्यांची जात माहिती आहे. आता आपण या सर्वांत जातीपातीत नको पडूयात. आत्तापर्यंत जी जी प्रकरणासमोर आली ती सर्व जातीच्या लोकांचे आहेत. सगळ्या जातीतल्या लोकांनी सगळ्या जातीच्या लोकांना मारले आहे. त्यामुळे तिथे जातीची नाही तर प्रवृत्ती बदलायची गरज आहे, असेही पुढे अंजली दमानिया म्हटलं आहे.
संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?
एका ट्रक ड्रायव्हरला मारण्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपासून तो ट्रक ड्रायव्हर गायब होता. काल एका शिक्षकाने स्वतःला बँकेसमोर गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं. संस्था चालकाकडे पगार मागितला म्हणून त्याने शिक्षकाला सांगितले “तू फाशी घे. म्हणजे तूही मोकळा आणि आम्हीही मोकळे.” सरकार काय करत आहे? सरकार काही पाऊले का उचलत नाही? त्या शिक्षकाची तीन वर्षांची मुलगी आणि त्याचे वयोवृद्ध आई-वडील आहेत, त्यांचं पुढे काय? 6 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या काळात त्या शिक्षकाने आझाद मैदानावर आंदोलन केले. काय मिळाले त्यातून? शेवटी त्याला प्राण द्यावे लागले. सरकार आणि विरोधी पक्ष यावर चर्चा का करत नाहीत? कबर, झटका, हलाल हे काय? इकडे लोक मरत आहेत, आणि तुम्ही नाटके करत आहात. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात काहीतरी बोललं पाहिजे. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे. अजित पवार कसले पालकमंत्री? जे मेले त्यांची नावं अजित पवारांना माहिती सुद्धा नाहीत, असंही पुढे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.