वाल्मिकचा मुलगा श्री अन् साथीदारांनी महादेव मुंडेंना संपवलं; बांगरांनी सांगितली इनसाईड स्टोरी

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे (महादो मुंडे) हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने तीव्र आंदोलन केल्यानंतर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने याप्रकरणी एसआयटी नेमली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही याप्रकरणी सरकारने एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. दरम्यान, वाल्मिक कराडनेच (Walmik karad) महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप वाल्मिक कराडचा जुना सहकारी असलेल्या विजयसिंह बांगर यांनी यापूर्वी केला होता. आता पुन्हा एकदा बांगर यांनी बीडमध्ये (Beed) पत्रकार परिषद घेत महादेव मुंडेंना कसं आणि कुठं मारलं याची इतंभू माहिती दिली. तसेच, वाल्मिक कराडसह त्याचा मुलगा श्री कराडही या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

महादेव मुंडे हत्याप्रकरणात यश मिळत असून सरकार या घटनेची दखल घेत आहे. महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदनाचे रिपोर्ट माझ्या हाती आले आहेत. त्यानुसार, त्यांच्या शरीरावर 15 ते 16 खोलवर जखमा असून अमानुष मारहाण असल्याचे यात उघड होत आहे. महादेव मुंडे यांची हत्या झाली कधी? असा प्रश्न विचारला असता ते घरी जात असताना कराडचा मुलगा श्री आणि त्याच्या साथीदाराने रेकी केली आणि हत्या केली. मुंडेंचा जीव जागेवर गेला नाही, तर क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या पायावर जखमा करण्यात आल्या. रेंगाळत असताना गालावर वार केला, नंतर अन्न नलिकेवर वार करण्यात आला. या सर्व जखमा खोलवर आहेत.

मी खोट बोलत नाही, या फोटोत ते स्पष्ट दिसत आहे. त्यांचा जीव थोडा राहिला होता, त्यावेळी मानेवर मार देण्यात आला. किमान 20 मिनिटे मारहाण झाली, अशी माहिती विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री कराड, गोट्या गित्ते आणि त्याच्या साथीदारांनी ही मारहाण केली. अमानुष मारहाण करत त्यांचे मास तोडून नेले. छोट्या फ्लॉट मधून इगो हर्ट झाला आणि मारहाण झाल्याचेही बांगर यांनी सांगितले.

नेमलेल्या एसआयटीमध्ये IPS अधिकारी नाही

सरकारला विनंती आहे की, आरोपींना तत्काळ अटक करावी. वाल्मिक कराडच्या मुलाचा देखील यात समावेश आहे. याप्रकरणी SIT नेमण्यात आली मात्र यात IPS अधिकारी नेमण्यात आला नाही. चांगले अधिकारी यात नेमले पाहिजे, अशी मागणीही बांगर यांनी केली आहे. तहसील कार्यालय परिसरात अज्ञात ठिकाणी त्यांचा मृतदेह टाकण्यात आला होता, परळी पोलिस देखील यात सहभागी असतील. हत्या होत असताना पोलिस हाटकत होते. त्यामुळे, याप्रकरणात मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर अराजकता पसरेल. म्हणून, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे, अशी माहितीही बांगर यांनी दिली.

हेही वाचा

मुंबईतील मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार; सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

आणखी वाचा

Comments are closed.