राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले

BEST Election Result मुंबई: सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले.

महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र आज पहाटे निकाल लागला आणि ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अशा निवडणुकांचं राजकारण करण्यात येऊ नये. ही पतपेढीची निवडणूक आहे. त्यात काही मोठं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  तसेच या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी राजकारण केलं. त्यांच्या राजकारणाला जनतेनं उत्तर दिलंय. या साध्या निवडणुकीतही जनतेनं त्यांना नाकारलं आहे. मतदारांनी ठाकरे ब्रँड नाकारला, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. शशांक राव आणि प्रसाद लाड देखील आमचेच आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?

पैशाचा वापर निश्चित झाला. पराभव झाला हे आरोप केले तरी टिका केली जाते. पैशांचा वापर झाला हे मी निवडणूकीपूर्वीच पुराव्यानिशी दाखवलं, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच ईओडब्ल्यूच्या नोटीसा आल्या. आता 15 लाखांत घर कशी देणार हे आम्ही बघतोय. जिंकल्यावर काही हळद्या हळकुंटाने पिवळी होणारी माणसं असतात. येवढी ताकद लावून 7 आले त्याचं आत्मपरीक्षण करायला हवं. पतपेढीच्या निवडणूकीवरून लिटमस्ट टे बोलू नये तर्क लावू नये. युद्ध अजून संपलेलं नाही, असंही संदीप देशपांडे म्हणाले. प्रसाद लाडांना एवढचं त्याच्या गुरूचं वाक्य सांगेन. मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना समंदर हू लोटकर वापर आऊंगा. प्रसाद लाड यांना वेळ आलं की कळेल. राव यांना अप्रत्यक्ष मदत झाली असेलते स्वत: तसं म्हणत आहेत. मुंबई बॅकेची निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक ही सारखी नसते.  मनसेने पहिल्यांदा पतपेढीची निवडणूक लढवली. आम्ही चांगली फाईट दिली, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय म्हणाले?

ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. काय झालंय हे माहित होत नाही तोपर्यंत बोलणार नाही. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत. यात कुणाला मोठं यश मिळालंय किंवा अपयश मिळालंय, असं वाटत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

ठाकरे बंधू बेस्ट पतपेढी निवडणूक का हरले?, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=cokko8ixtni

संबंधित बातमी:

Mumbai BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? ‘या’ गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला

आणखी वाचा

Comments are closed.