महायुतीतील मित्र पक्षाची गरज वाटत नाही; भंडाऱ्याच्या चारही नगरपालिका स्वबळावर लढणार: परीणय फुके


भंडारा न्यूज : राज्यात महायुतीत सहभागी असलेले भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर निवडणुकीबाबत एकवाक्यता झालेली नाही. अशात भंडाऱ्यातही भाजप आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगरपालिकेची निवडणूक होत आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची सर्वेनुसार चाचपणी पूर्ण झालेली असून स्थानिक महायुतीच्या घटक पक्षातील नेते असो, कार्यकर्ते असो किंवा अन्य कुणासोबतही निवडणुकीच्या युतीबाबत चर्चा झाली नसून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही निवडणूक लढविण्यात येईल आणि यासाठी भाजपची स्वबळावरची तयारी पूर्ण झाली आहे, युती करण्याची गरज वाटत नसल्याचा दावा भाजपाचे भंडारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमदार परीणय फुके यांनी केला आहे.

Parinay Fuke : युतीबाबत कोणाशीही बोलणं झालेलं नाही, त्यामुळे भाजपची स्वबळावरची तयारी

जिथं नगरपालिका निवडणूक होत आहे, तिथल्या स्थानिक नेत्यांवर कुठल्या पक्षासोबत युती करायची की, नाही करायची हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडलेला आहे. त्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी आहे. प्रत्येक वार्ड आणि प्रभाग निहाय भाजपच्या उमेदवारांची चाचपणी सर्वे पूर्ण झालेले आहेत. भंडारा जिल्ह्यातील चारही नगरपालिका क्षेत्रात जनतेचा भाजपला मोठ्या प्रमाणात कौल दिसून येत आहे. युती करायची गरज असल्याचं वाटत नाही. मात्र, स्थानिक नेत्यांवर ती जबाबदारी सोपविली आहे. माझं स्थानिक आमदार असो, स्थानिक नेते असो, कार्यकर्ते, मित्रपक्षाशी असो यांच्याशी बोलणं होतं असतं, संपर्क आहे. मात्र, युतीबाबत कोणाशीही बोलणं झालेलं नाही, त्यामुळे भाजपची स्वबळावरची तयारी आहे. असं मोठं वक्तव्य भाजपाचे भंडारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आणि देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू आमदार). केलंय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.