धक्कादायक घटनेनं भंडारा हादरलं! अस्तित्वाची लढाईतून हाणामारी, दोन जणांची धारदार शस्त्रानं हत्या

भंडारा क्राइम न्यूज: मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरु होती. त्यातूनचं आज दोघांवर धारदार शस्त्रानं हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना भंडाऱ्यात रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. वसीम उर्फ टिंकू खान (35) आणि शशांक गजभिये (30) असं दोन्ही मृतांची नावे आहेत.

टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये मागील काही वर्षांपासून वाद

हल्ला करणारे हे तीन ते चार च्या संख्येत होते आणि टिंकू खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयात बसले असताना हल्लेखोरांशी वाद झाला आणि त्यातूनच ही हत्या घडल्याची माहिती समोर येत आहे. टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यात वाद चालू होता आणि यातूनच ही हत्या घडल्याचं बोलल्या जातं आहे.

परळीत पैशासाठी आजीला मारहाण, मारहाणीत आजीचा मृत्यू

परळीतील (Parli) तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैशासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेले आई-वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या आजीला परळीहून अंबाजोगाईला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला आहे.   जुबेदा इब्राहिम कुरेशी (वय 80) असं मृत्यू झालेल्या आजीचं नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेतले आहे. आरबाज सत्तूर हातात घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केवळ 15 मिनिटांत आरोपीला ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक ढोणे यशस्वी झाले. विशेष म्हणजे, आरोपीकडे धारदार शस्त्र असतानाही त्यांनी अतिशय शिताफीने आणि धाडसाने ही कारवाई केली.

नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जनाबाई जगन बदादे या 65 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत चार बळी गेल्याने संतप्त नागरिकांनी मृत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट वनविभागाच्या कार्यालयासमोर आणून रास्ता रोको आंदोलन केले. वनविभागाचे अधिकारी तत्काळ पोहोचले नाहीत. त्यांनी वेळीच बिबट्याचा बंदोबस्त केला नाही. त्यामुळं चौथा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रास्ता रोकोमुळं दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. अखेर लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृत जनाबाई बदादे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:

Beed Crime: नशेच्या आहारी गेलेल्या 20 वर्षीय नातवाचा पैशासाठी आजीवर हल्ला, 80 वर्षाच्या आजीचा मृत्यू, आई-वडीलही जखमी

आणखी वाचा

Comments are closed.