अजित पवारांच्या राष्ट्रवादी अन् भाजपच्या विजय रॅलीत राडा; विजयी उमेदवारांकडून एकमेकांवर अंडाफेक
भंडारा न्यूज : भंडाराच्या तुमसर नगरपालिकेचा निवडणूक निकाल (Tumsar Municipal Council Election Result 2025) घोषित झाल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान भाजपचे विजयी नगरसेवक पंकज बालपांडे यांनी एका महिलेला मारहाण करीत शिवीगाळ केली. या प्रकरणी काल (22 डिसेंबर) बालपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. भाजपचे नगरसेवक पंकज बालपांडे यांची विजयी रॅली निघालेली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar NCP) विजयी उमेदवार वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अंडा फेकून मारल्यानं हा वाद वाढल्याचं आता समोर आलं आहे.
Bhandara News : दोन्ही उमेदवारांच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
दरम्यानया प्रकरणात आता पंकज बालपांडे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामीमहायुतीतील दोन्ही पक्ष एकमेकांसमोर भिडल्याचं चित्र तुमसरात रंगलं आहे. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे पंकज बालपांडे निवडून आलेत. तर, दुसरा नगरसेवक हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा लांजेवार निवडून आल्यात. भाजप उमेदवार पंकज बालपांडे यांची विजयी रॅली निघाली असताना वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बालपांडे यांच्या विजय रॅलीवर अंडे फेकून मारलेत. यातून हा वाद निर्माण झाल्याचं आता उघड झालं आहे.
Bhandara News : ईव्हीएम मशीनमध्ये करुणा राऊत यांचे नाव नसल्याचा आरोप
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या करुणा राऊत यांनी आक्षेप घेतला होता. मतमोजणी केंद्रावरील एका ईव्हीएम मशीनमध्ये त्यांचं नाव नसल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर मतदान केंद्रावर जे साहित्य पाठविलं त्याची तपासणी योग्य केली नाही, आणि त्याची जुळवाजुडवं योग्य आहे की नाही, ही खातरजमा नं करता त्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. करुणा राऊत यांना 58 मतं पडलेली आहेत. तर विजयी झालेल्या रीता मेश्राम यांना 2011 मतं मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 7 बूथ होते आणि 7 ईव्हीएम मशीन होत्या. त्यातील एका मशीनमध्ये करुणा राऊत यांचे नाव नसल्याचा आरोप आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.