…म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत; भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, कितीही एकत्र
राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर भरत गोगावले: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंमधील जवळीकतेत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने भेटीगाठी सुरू असून, या कालावधीत दोघांमध्ये सात वेळा भेटी झाल्या आहेत. या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर खोचक टीका केली आहे.
Bharat Gogawale on Raj Thackeray Uddhav Thackeray: काय म्हणाले भरत गोगावले?
मंत्री भरत गोगावले म्हणाले की, “ते दोघे भाऊ आहेत. या दोघांनाही आता दुसरा काही पर्याय उरलेला नाही, म्हणूनच ते सारखे एकत्र येत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर, “राज्यात या दोन्ही पक्षांची जी परिस्थिती आहे, ती पाहता ते एकत्र येत असतील. कारण कालपर्यंत एकमेकांची उणी धुणी काढत होते हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. मात्र, या परिस्थितीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत,” असंही मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं.
Bharat Gogawale on NCP Sharad Pawar Faction: गोगावलेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सल्ला
दरम्यान, पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची सरकारकडून घोषित करण्यात आलेली मदत अद्याप मिळालेली नसल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज पेन शहरात काळी दिवाळी साजरी करत भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावर बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय. आंदोलन करण्यापेक्षा सरकार जी मदत करतंय, त्या मदतीत हातभार लावा, असा टोला त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लगावलाय. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडलेलं नाही. शिवाय सरकार शेतकऱ्यांच्या पंचनाम्यानंतर त्वरित मदत त्यांच्या खात्यात जमा करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.