भरत गोगावलेंच्या मुलाचं महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण, आज अटकपूर्व जामीनावर सुनावणी
विकास गोगावले महाड गुन्हा: नगरपरिषद निवडणुकीवेळी झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपी असलेले आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे पुत्र विकास गोगावले यांनी शुक्रवारी महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. विकास गोगावले (Vikas Gogawale) हे आज सकाळी कोणालाही खबर लागून न देता महाड पोलीस ठाण्याच्या (Mahad Police station) मागच्या दाराने आत गेले आणि पोलिसांना शरण गेले. आता महाड पोलिसांकडून विकास गोगावले यांना न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाने विकास गोगावले यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या अटकपूर्व जामीन (anticipatory bail) अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार का, हे बघावे लागेल. 2 डिसेंबर 2025 पासून आजपर्यंत विकास गोगावले फरार होते. (Cirme news in Marathi)
मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले अखेर एक महिन्याच्या कालावधीनंतर महाड पोलिसांना शरण आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाड पोलीस ठाण्याबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवसेनेचे विकास गोगावले महाड पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे. सध्या पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विकास गोगावले यांना थोड्याच वेळात पोलीस कोर्टात हजर केले जाईल. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले फरार झाल्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. मंत्र्यांची मुलं सापडत कशी नाहीत, अशा शब्दांत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विकास गोगावले यांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापूर्वीच विकास गोगावले महाड पोलिसांना शरण गेले.
Vikas Gogawale news: नेमकं प्रकरण काय?
महाड नगरपालिका निवडणूक दरम्यान राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि विकास गोगावले समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता या नंतर वाहनांची तोडफोड आणि एकमेकांवर हल्ले केल्याप्रकरणी महाड पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षाच्या परस्पर विरोधी कारवाया करण्यात आल्या होत्या.त्यानंतर विकास गोगावले यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अद्यापही पोलिसांना शरण आले नव्हते त्यानंतर कोर्टाने देखील या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला. आता त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार सहित पोलिसांना फटकारत अजूनही आरोपी कसे सापडत नाहीत अशा स्वरूपात नोटीस बजावली होती. त्यानंतर आज मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे आज महाड पोलिसांसमोर शरण झाले.
आणखी वाचा
मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना काहीही करता येत नाही; महाड राड्यावर उच्च न्यायालयाची नाराजी
आणखी वाचा
Comments are closed.