अदिती तटकरेंना रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान मिळताच भरत गोगावले नाराज, मंत्रिमंडळाच्या बैठकीला दा

Bharat Gogawale : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि शिवसेनेच्या भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यात संघर्ष सुरु आहे, तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शिवसेनेचे दादा भुसे (Dada Bhuse) आमने-सामने आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्यदिनी (independence Day 2025) कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सोमवारी जाहीर केली आहे. या यादीनुसार, रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगडमधून अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच मंत्री भरत गोगावले यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आज कॅबिनेट बैठक होणार असून मंत्री भरत गोगावले या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील १५ ऑगस्ट निमित्तच्या ध्वजारोहणाता मानपानावरून शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना, ध्वजरोहणासाठी यंदा भरत गोगावले यांना मान मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेची होती.

भरत गोगावले कॅबिनेटला उपस्थित राहणार नाहीत

सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत अदिती तटकरेंचं नाव असल्याने रायगडमधील शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत ‘एबीपी माझा’ने मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क केला असता, आपण मुंबईबाहेर असून आज कॅबिनेटलाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, गोगावले जरी कौटुंबिक कारणांमुळे कॅबिनेटला उपस्थित राहत नसले तरी त्या मागे मानपानाचं नाराजीनाट्य असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भरत भोगावले पालकमंत्री व्हावे : उदय सामंत

दरम्यान रायगडमधून आदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी यादी प्रसिद्ध झाली आहे, ती पालकमंत्रीपदाची यादी नाही. ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यात कोण-कोण कुठे करणार आहे, याबाबतची यादी प्रसिद्ध झाली आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच भरत भोगावले पालकमंत्री व्हावे यासाठी आग्रही असल्याचे देखील उदय सामंत यांनी म्हटले आहे.

मी नाराज नाही : दादा भुसे

तर गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत असतात. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचे पालन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच आपण नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

मोठी बातमी : अदिती तटकरे रायगडमध्ये, अजितदादा बीडमध्ये ध्वजारोहण करणार, नाशिकचाही निर्णय फायनल!

आणखी वाचा

Comments are closed.