अवघ्या 24 वर्षांच्या पोलीस कॉन्स्टेबलनं उचललं टोकाचं पाऊल, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच

भयंदर बातम्या: स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day 2025) आदल्या दिवशी राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाच, भाईंदर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 24 वर्षीय पोलीस शिपायाने गुरुवारी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस (Police) दलात खळबळ उडाली असून, पोलीस कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृत पोलीस शिपायाचे नाव रितिक भाऊसाहेब चव्हाण (24) असून, ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते. 2023 मध्ये मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात भरती झाल्यानंतर त्यांची नेमणूक भाईंदर पोलीस ठाण्यात झाली होती. सध्या ते भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्लीमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.

राहत्या घरात घेतला गळफास

गुरुवारी दुपारी रितिक चव्हाण हे आपल्या राहत्या घरात एकटे असताना त्यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली. बराच वेळ घर बंद असल्याने आणि कोणतीही हालचाल जाणवली नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात डोकावून पाहिल्यानंतर रितिक यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

सहकाऱ्यांमध्ये शोककळा

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे. पोलीस दलात नुकतेच भरती झालेले रितिक चव्हाण यांनी इतके टोकाचे पाऊल उचलल्याने सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना घडलेली ही घटना अत्यंत दुःखदायक असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Beed News: पतीनं चार दिवसांपूर्वी गळ्याला लावली दोर; विरह सहन न झाल्याने पत्नीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं, तान्ह्या बाळाला घरात ठेवलं अन् पहाटे…

Digital Arrest : खऱ्या पोलिसांना भामटे समजले! मुंबईत 81 वर्षीय महिला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात; महिन्याभरात गमावले 8.70 कोटी रुपये

आणखी वाचा

Comments are closed.