‘मुलगी जर आमच्याकडे आली नाही तर…’, भिगवण अपहरण प्रकरणातील तरूणीची आई पहिल्यांदाच बोलली
भिगवण : आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा थरारक अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला दांडक्याने मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये कोंबून नेले, अशी फिर्याद तरूणीच्या आईने आणि भावाने दिली होती. या प्रकरणी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस (Bhigwan Kidnapping Case) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुलीने मी माझ्या मर्जीने गेली असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे, तर त्याउलट तिच्या नातेवाईकांनी तरूणी स्वतःहून गेली नाही तर तिला पळवून नेलं असल्याचा दावा केला आहे, तर या तरूणीच्या आईने माध्यमांशी बोलताना मुलीवर आधीपासून दबाव असल्याचं सांगितलं आहे, तर मुलगी आमच्यासोबत आली नाही तर आम्ही इथेच आत्महत्या करू असं म्हटलं आहे.(Bhigwan Kidnapping Case)
मुलगी जर आमच्याकडे आली नाही तर…
मुलीच्या आईने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, माझे पती कोरोनामध्ये निधन झाल्यानंतर या लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे. गेल्या बारा वर्षापासून माझी मुलगी दबावाखाली आहे. मुलगी जर आमच्याकडे आली नाही तर आम्ही याच ठिकाणी आत्महत्या करू. आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीत, कोणत्याही मंत्र्याचे आम्हाला सहकार्य नाही. पोलीस म्हणाले, मुलीला आम्ही कोर्टात घेऊन जाणार आहोत, कोर्टात चला. मुलगी म्हणत आहे की, मला आई बरोबर यायचं नाही. मिरची पावडर टाकली होती. माझ्या डोळ्यात माझ्या मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, आम्हाला मारहाण केली, पायावर मारहाण झाली आहे. मुलीला उचलून टाटा एसी गाडी टाकली त्यावेळी मी फक्त ओरडत राहिली, तिथे कोणीही आमच्या मदतीला आलं नाही, कारणं तिथे कोणीच नव्हतं. बारा वर्षापासून मुलीला दबावाखाली आणल्यानंतर तिचा भाऊ लहान असल्यामुळे तिला ब्लॅकमेल करत आहेत. मुलगी हे सर्व बदलाखाली बोलत आहे. मुलीची तक्रार खोटी असून ती अद्यापही दबावाखाली आहे.
मुलगी दबावाखाली आहे म्हणूनच असं बोलत आहे, अशी बोलणारी आमची मुलगी नाही, त्यांनी आमच्या घरात मोठा माणूस नसल्याचा गैरफायदा घेतला. मुलगी जहीर शेख याच्या दबावाखाली बोलत आहे. माझ्या मुलीला ब्लॅकमेल केले जात आहे, 21 वर्षाची होऊ दिली आणि आता तिला ब्लॅकमेल केले जात आहे. आम्ही तिच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. वडिलांच्या निधनानंतर तिच्यावर कोणचीही वाईट नजर पडू नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले. मात्र काही व्यक्तींकडून तिच्यावर दीर्घकाळ मानसिक दबाव टाकण्यात येत असल्याचा आमचा संशय आहे,असंही तरूणीच्या आईने म्हटलं आहे.
व्हिडीओ खरे आहेत, की खोटे आहेत ते समजत नाहीये- तरूणीचे काका
आम्हाला ती बातमी रात्री समजली, मुलगी बारामती पोलिस स्टेशला हजर आहे, पण आम्हा जाण्यास अडचण आली मुलीच्या आईची तब्येत बिघडली, त्यामुळे तिला भिगवणच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यामुळे आम्ही काल रात्री जाऊ शकलो नाही. आज आम्ही काही वेळात निघणार आहे. आमच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आला की, त्यात ती म्हणाली की, ९ वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहेत, त्यानंतर आजच्या प्रतिज्ञापत्रात म्हणलंय की १ वर्षापासून प्रेमसंबंध आहेत, व्हिडीओ बनवताना आणि व्हिडीओवेळची ही तफावत कशी आहे, किंवा बनवताना व्हिडीओ कसे बनवलेत, या गोंधळात आहे, सत्य बाहेर यायला तयार नाही, आमची मुलगी आमच्या ताब्यात आली की आम्ही तिच्याशी बोलू, त्याचबरोबर तिने बनवलेले व्हिडीओ खरे आहेत, की खोटे आहेत ते समजत नाहीये, आणि आम्ही ते काही सांगू शकत नाही. मुलगी आता प्रशासनाच्या ताब्यात आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे, ती दबावाखाली आहे का ते सांगता येत नाही, तिचे घरचे आई, भाऊ, काका, सगळे नातेवाईक जाऊन तिच्याशी बोलणार त्यानंतर जो काही आहे तो निर्णय घेणार असल्याचं मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.
स्वतःहून गेली नाही तर तिला…- तरूणीचा भाऊ
तर तरूणीच्या भावाने माध्यामांशी बोलताना सांगितलं की, त्या दिवशी आम्ही लग्नाची खरेदी करून येत होतो, त्यावेळी रस्त्यात अडवून आम्हाला मारहाण केली, आमच्या डोळ्यात चटणी टाकली, आणि माझ्या बहिणीला गाडीत टाकून नेले, ती स्वतःहून गेली नाही तर तिला जबरदस्तीने नेलं आहे, घटना घडली तेव्हा तिथे दुसरं कोणीचं नव्हतं, ती तिचं ती गेलेली नाही, तीला नेलं आहे, तिला आमच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे, असंही तरूणीच्या भावाने म्हटलं आहे.
…तर मी पोलिस स्टेशनसमोर आत्महत्या करेन – तरूणीचा मामा
पोलिसांनी तिचे व्हिडीओ आणि बाकी गोष्टी चेक करून घेतल्या पाहिजेत, ती म्हणते चटणी टाकलेली नाही, तिथं चटणी पडलेली होती. ती पोलिसांना देखील सापडली आहे. त्याचबरोबर आज तिने जे सांगितलं की, तिच्या भावाच्या फोनवरून फोन केला होता ते, मग तिच्याकडे जर फोन होता, तर तिने भावाच्या फोनवरून फोन का केला होता, पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केला आहे. त्याचे कॉल रेकॉर्ड काढले पाहिजेत, कोण काय बोललं आहे ते, कोणी कॉल केला आहे, ती सगळी माहिती समोर आली पाहिजे, आरोपींना आधी अटक करावी, आरोपीच्या हाती माझी भाची होती, तिच्यावरती दबाव टाकलेला होता. ती दुसरीकडे होती शिकायला मग हे दोघे रिलेशनशीपमध्ये कसे आले, असा सवाल मुलीच्या मामाने उपस्थित केला आहे. तर त्यांनी पुढे म्हटलंय की, मुलीला आम्ही भेटलेले नाही, ती घाबरलेली आहे, त्यामुळे ती तशी बोलत आहे, आम्ही गेल्यानंतर ती आमच्यासोबत येईल असा विश्वास मला आहे, ती नाही आली तर मी तिथेच आत्महत्या करणार आहे, पोलिस स्टेशनसमोर मी आत्महत्या करणार आहे, तिच्या मनात भीती निर्माण केली आहे. तिला वडील नाहीत, त्यामुळे ती घाबरत आहे, त्यांनी तिला भीती दाखवली आहे, भावाला आईला मारणार अशी भीती घातली असेल तिला, तिला घाबरवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या तरूणीच्या मामाने केली आहे. मुलगी आमच्यासोबत आली नाही कर मी कुटूंबासह आत्महत्या करणार आहे, कारण आम्हाला जगायचा अधिकारच राहिलेला नाही, असंही मुलीच्या मामाने म्हटलं आहे.
Comments are closed.