नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करणं बेतलं जीवावर; भिवंडीत एकाचा मृत्यू, तीन जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी क्राईम न्यूज : भिवंडीतील न्यू आझाद नगर शांतीनगर परिसरात नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वाद शांत करण्याच्या प्रयत्नात तिघांनी संगनमत करुन धारदार शस्त्राने हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले आहे. घटना मामा हॉटेलजवळील न्यू आझादनगर झोपडपट्टीत घडली असून आरोपी व मृतक हे परस्पर नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत दिलशाद शाह यांची मावस बहीण आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होता. हा वाद शांत करण्यासाठी दिलशाद शहा मध्यस्थी करण्यासाठी गेले असता मावस बहीणीला घरी आणले. याचा राग मनात धरून मावस बहीणीच्या पतीचे भाऊ आरोपी आसिफ अब्दुलहकीम शहा, अलिहसन अब्दुलहकीम शहा आणि मुजफ्फर अब्दुलहकीम शहा यांनी संगनमत करून दिलशाद शहा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत दिलशाद शहा याला उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . कौटुंबिक वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शांतीनगर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास पोलिस करत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये तिरंगी रंगाचे फुगे घेताना सिलेंडरचा स्फोट, 4 जण जखमी

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभक्तीचा रंग चढल्याचे पाहायला मिळत आहे. खिशावर तिरंगा, तिरंगी सजावट करुन सर्वत्र उत्साहात ध्वजारोहन झाले. मात्र, नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये तिरंगी रंगाचे फुगे घेताना सिलेंडरचा स्फोट होऊन अपघात घडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर फुगे घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांजवळ अचानक नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये, 4 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

BJP Leader Nephew Murder Case: दुपारी मोठ्या भावाला दिली धमकी, संध्याकाळी लहान भावाला संपवलं; भाजप नेत्याच्या पुतण्याच्या हत्येची थरारक कहाणी

आणखी वाचा

Comments are closed.