भिवंडीत मुदतबाह्य पिठाचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा तडाखा सुरूच असून भिवंडीत अधिकाऱ्यांनी मुदतबाह्य पिठाचा नऊ टन साठा जप्त केला आहे. निजामपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ५ लाख १८ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध पथकातील सहाय्यक आयुक्त संतोष सरोसिया, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर, प्रवीण शिंदे, अर्शद सय्यद यांना भिवंडीत एका ट्रकमधून मुदतबाह्य पिठाचा साठा गुजरात भूज येथील व्यापारी विनोद भानुशाली यांना विक्रीसाठी पाठवला जाणार आहे अशी खबर मिळाली होती. याची गंभीर दाखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे व त्यांच्या पथकाने संशयित ट्रक अडवला. याप्रकरणी ट्रकचालक फारुक जुसब खलीफा व दलाल फरहान मुकीम अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.