केतनच्या डमी पुतळ्याच्या मदतीने लोहगडावर ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; सिया गोयलला घेऊन पोलीस घटनास्
पुणे/लोणावळा: लोहगड किल्ल्यावरील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Death) प्रकरणाच्या तपासात आज (रविवार २८ जून २०२६) रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या संपूर्ण हत्याकांडाचा (Ketan Agrawal Death)कट कसा रचला आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी झाली, हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी (Ketan Agrawal Death) थेट लोहगड किल्ल्यावर जाऊन ‘क्राईम सीन रिक्रिएट’ (गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा उभा) केला. या तपासादरम्यान मुख्य आरोपी सिया गोयल हिला कडक पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी आणण्यात आले होते.(Ketan Agrawal Death)
Ketan Agrawal Death : डमी पुतळ्याच्या साहाय्याने घटनाक्रम उलगडला
१८ जून रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस आपल्यासोबत एक ‘डमी पुतळा’ (मानवी आकाराची प्रतिकृती) घेऊन लोहगडावर पोहोचले होते. केतन अग्रवाल याला नेमके कशा प्रकारे दरीत ढकलले गेले, याचा सिलसिलेवार तपास करण्यासाठी या डमी पुतळ्याची मदत घेण्यात आली. आरोपी सिया गोयल हिच्या उपस्थितीत पोलिसांनी कड्यावरून हा डमी पुतळा खाली ढकलून संपूर्ण घटनाक्रमाचे अत्यंत बारीकीने पुनरावलोकन केले.
Ketan Agrawal Death : सकाळी ८ वाजता मोहीम; पर्यटकांसाठी किल्ला बंद
रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलिसांचे पथक सिया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सुमारे अडीच तास म्हणजेच सकाळी १०:३० वाजेपर्यंत घटनास्थळावर ही तपास प्रक्रिया आणि पाहणी सुरू होती. या क्राईम सीन रिक्रिएशनदरम्यान कमालीची गुप्तता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. तपास सुरू असेपर्यंत लोहगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात कोणत्याही पर्यटकाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला किल्ल्यावर प्रवेश दिला गेला नाही.
Ketan Agrawal Death : वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती; तपासातील महत्त्वाचे दुवे जोडण्याचा प्रयत्न
या तपासाच्या वेळी पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी स्वतः हजर होते. १८ जून रोजी कथितरीत्या या संपूर्ण निर्घृण हत्याकांडाला कशा प्रकारे अंमलात आणले गेले, याच्या प्रत्येक कड्या जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या क्राईम सीन रिक्रिएशनमधून मिळालेले पुरावे न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने करत आहेत.
Ketan Agrawal Death : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात सियाची धक्कादायक कबुली?
“लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले”, सिया गोयलची पोलिसांना कबुली दिल्याची माहिती आहे. “नोव्हेंबरमध्ये होणारे लग्न मोडल्यास कुटुंबाच्या भावना दुखावल्या जातील”, अशी सियाची भावना होती. लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने चौकशीत सांगितल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. केतनशी लग्न करायचे नसल्याने प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून कट रचल्याचा दोघांवर आरोप आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून विविध पैलूंवर तपास सुरू आहे.
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.