भिवंडीत अग्नितांडव! एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना; टायर गोदामसह, लाकडाची
भिवंडी आग बातम्या: भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात एकाच दिवशी मध्य रात्रीच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या (Fire News) घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. निंबवली आणि येवई गावांच्या हद्दीत लागलेल्या या आगीत (Bhiwandi News) संपूर्ण गोदाम जळून खाके झाले आहेत .सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. फक्त या आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. (भिवंडी आग बातम्या)
Bhiwandi Fire News: निंबवली गावाच्या हद्दीत टायर गोदाम, लाकडाची वखार आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग
दरम्यानपहिल्या घटनेत भिवंडी तालुक्यातील निंबवली गावाच्या हद्दीत टायर गोदाम, लाकडाची वखार आणि प्लास्टिक गोदामाला मध्यरात्री 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तब्बल सात ते आठ गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळालगत गॅस एजन्सी असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Bhiwandi Fire News: लाकडाच्या वखारीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
दरम्यान दुसऱ्या घटनेत याच रात्री येवई गावाच्या हद्दीत लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा असल्याने आग वेगाने पसरली आणि संपूर्ण वखार जळून खाक झाली. या गदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा होता. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Crime News : उल्हासनगरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला; मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगरात किरकोळ वाहन धडकेच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्लाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 मधील निजाम बिल्डिंगसमोरील आजाद नगर परिसरात बुलेट आणि अॅक्टिव्हा या दोन वाहनांमध्ये किरकोळ धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही गटातमध्ये वाद निर्माण झाला आणि वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले.संतप्त झालेल्या 5 ते 7 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घेरून बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांसह त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत संबंधित तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेनंतर परिसरात तणावाच वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.