उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपू

राज ठाकरे संजय दिने पाटील मतदारसंघात: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुंबई पूर्व उपनगरच्या दौऱ्यावर आहेत. पूर्व उपनगरात दोन शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 वाजता  विक्रोळी येथील म्युन्सिपल कॉलोनी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

मनसेचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेत नुकतच बंड झालं. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत शिंदे सेनेत प्रवेश केला. या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईमध्ये दौरा केला होता. अशातच आज राज ठाकरे ही बंडखोर खासदार संजय पाटील यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. मुंबई पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी खासदारांचे पक्षांतर यावरून चांगलीच टीका केली. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल. (Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency)

ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांबाबत राज ठाकरे काय म्हणाले होते? (Raj Thackeray On Opration Tiger)

ठाकरे गटाचे जे खासदार फुटले, त्याबाबत माझा एक प्रश्न आहे. केंद्रात सत्ता कोणाची ? भारतात सत्ता कोणाची ? भाजपची ना, मग हे 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? यामागे एक कारण आहे. 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. अन्यथा हे 6 खासदार भाजपमध्ये गेले असते, असे राज ठाकरे यांनी म्हटले. सध्याच्या घडीला भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत आहे. आतून सगळं पेटलेलं आहे. नरेंद्र मोदी असल्यामुळे सध्या सगळं शांत आहे. पण काहीजण बोलत आहेत की, येत्या काही दिवसांमध्ये केंद्रात आणि अनेक ठिकाणी गोंधळ होईल. त्यामुळे तयार व्हा, ज्यावेळी वेळ येईल तेव्हा तुम्ही जमिनीत पाय रोवून उभे राहिले पाहिजे, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला.

जनगणना आणि दुबार मतनोंदणीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवा: राज ठाकरे (Raj Thackeray on BJP)

जनगणना 30 जूनपासून सुरू होत आहे. हे करताना त्या अधिकाऱ्यांसोबत भाजपची लोकं आहेत का, हे बघा.  कोण येतजात आहे, काय बघत आहे, यावर लक्ष ठेवा. जनगणना करताना गप्पांच्या ओघात हा आपला मतदार आहे की नाही, याची नोंदणी केली जात आहे का, हे बघा. पक्षातील सर्वांना माझी विनंती आहे की, या सगळ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. तीन वर्षात काय गायब होईल खालून हे कळणारही नाही. यासाठी आपल्या पक्षाकडून चांगली सिस्टम लावली जाणार आहे. दुबार मतदार दोनपैकी एका जागेवर नाव ठेवणार. पण एकाचवेळी आपल्या कडे मतदान होत नाही, मग युपी बिहारचे काय करणार ते इथेही मतदान करणार आणि गाड्या भरून तिथे जाऊन मतदान करणार. 2018 ला मी बोलत होतो की निवडणुकांवर बहिष्कार टाका. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेले नसते, सत्तेपासून हे ही दूर होतील. ज्यांनी 60 वर्षे राज्य केले या देशावर, त्या काँग्रेसची परिस्थिती काय हे बघा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Raj Thackeray On Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील भरकटले, आम्हाला वाटलेलं खाकी रंग पोलीस दलाचा; राज ठाकरेंची बेधडक पोस्ट, काय काय म्हणाले?

Comments are closed.