शिवसेना पक्षांतरानंतर ओमराजेंच्या गडात आज उद्धव ठाकरेंची गर्जना; शिवसैनिकांकडून जय्यत तयारी…

उद्धव ठाकरे धाराशिव सभा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षातील 6 खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पक्षांतर केलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dharashiv Sabha) जाहीर सभा घेत आहेत. अशातच अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी साथ सोडल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी तीन वाजता शहरातील सिताई मंगल कार्यालयात होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेत ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावर काय भूमिका मांडतात, कोणते आरोप करतात आणि कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Dharashiv News : धाराशिवमध्ये ठाकरे विरुद्ध ओमराजे असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं

दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने या सभेद्वारे मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली असून, धाराशिवमध्ये ठाकरे विरुद्ध ओमराजे असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. आजच्या सभेनंतर धाराशिवच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. ओमराजे यांनी बंड केल्यानंतर आता ठाकरेंचे जुने शिवसैनिक एकवटायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे आज धाराशिवच्या राजकारणातील महत्वाचा दिवस मानला जात असून या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Dharashiv News : धाराशिवमध्ये संजय राऊत यांच्या त्याने हातात रायफल घेतलील्या बॅनरची चर्चाउद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर विरोधात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. ठाकरे काय बोलणार यासोबतच संजय राऊत काय बोलणार याकडे ही शिवसैनिकांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच हातात रायफल घेऊन उभे असलेले संजय राऊत यांचे बॅनर सभास्थळावर लागले आहेत. राऊतांच्या निशाण्यावर ओमराजे आहेत. त्यामुळे आज ते कसा निशाणा साधणार, याकडे लक्ष लागलं आहे. ‘सौ दाऊत, एक राऊत’ या राऊतांच्या लोकप्रिय घोषणेसह हातात रायफल घेतलेले बॅनर आहेत. तसेच जुने ठाकरेंचे शिवसैनिक पुन्हा एकवटणार असल्याचे काही संकेत मिळत आहेत. अखंड शिवसेना असताना जिल्हाप्रमुख राहिलेल्या अनिल खोचरे यांच्या मुलाकडून आता ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. अनिल खोचरे सध्या शिंदेंकडे असल्याने ठाकरेंच्या स्वागतासाठी मुलाने लावलेल्या बॅनर्जी आता चर्चा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.