‘तुम्हाला लोकांची ऍलर्जी, म्हणूनच मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ’ : श्रीकांत शिंदे
उद्धव ठाकरे अहिल्यानगरवर श्रीकांत शिंदे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेतील फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरा सुरू केला असून ते या सभेतून जोरदार टीका करत आहेत. यावरून बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार काउंटर हल्ला करत प्रत्युत्तर हृदय आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले ते, उद्धव ठाकरे आत्ताशी बाहेर पडलेत आणि लोकांना गद्दार- गद्दार म्हणत आहेत. कालपर्यंत ते तुमच्या सोबत होते, त्यावेळेला ते चांगले होते आणि आता गद्दार कसे झाले? आज खासदार, आमदार तुम्हाला सोडून गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही त्यांना शिव्या द्यायच्या, एवढेच तुम्हाला शिकवलंय का? तुम्ही आत्मा परीक्षण कधी करणार? शिंदे साहेबांसोबत लोक का जोडले जात आहेत, कारण त्यांच्या अडी-अडचणीत फक्त शिंदे साहेबच त्यांच्या उपयोगी पडतात. तुम्हाला लोकांची ऍलर्जी आहे. म्हणूनच लोक तुम्हाला सोडून जात आहेत. आता कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेत आहेत, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशी परिस्थिती का आली? याच त्यांनी आत्मपरीक्षण करायला हव, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हंटले आहे.
Shrikant Shinde: कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आमचा दौरा असतो, शिव्या- शाप देण्यासाठी आमचा दौरा नसतो
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच श्रीकांत शिंदे यांनी दौरा सुरू केला का? असे विचारले असता, माझा दौरा आधीपासून सुरू झालाय. आतापर्यंत 62 विधानसभा मी फिरून झालो आहे. पुढच्या आठवड्यात विदर्भ, नगर, कोकणला देखील जाणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे. कुणाला शिव्या- शाप देण्यासाठी आमचा दौरा नसतो , कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आमचा दौरा असतो, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
Shrikant Shinde: आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत म्हणूनच सर्व लोक शिवसेनेसोबत जोडले जातात.
येत्या काळात शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर थ्री पॉईंट झिरो राबवले जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे, दरम्यान आपल्या सोबत काही आमदार संपर्कात आहेत का असे विचारले असता श्रीकांत शिंदे म्हणाले की, शिंदे साहेबांच्या संपर्कात सगळेच लोक आहेत. शिंदे साहेबांवर विश्वास दाखवून लोक त्यांच्या सोबत जोडले जातात. शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर कोणतंही काम होत असतं. ते विरोधी पक्षाचेही काम करतात. त्यामुळे सर्वांना विश्वास आहे की त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होतच. आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत म्हणूनच सर्व लोक शिवसेनेसोबत जोडले जातात. संपर्कात नसल्यानंतर काय परिस्थिती होते हे सर्वांना माहीत आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार या चर्चेबाबत बोलताना खा.श्रीकांत शिंदे म्हणाले की, राजकारणात चर्चेला काही अर्थ नसतो. ओमराजे निंबाळकर यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे असंहे विशेषदार शिंदे म्हणाले.
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : प्रभू श्रीरामांच्या, हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन ठाकरे सेनेने काँग्रेसचे पाय पकडले
राम मंदिर उभारणीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि एनडीए वर टीका केली होती. याला उत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. प्रभू श्रीरामांच्या विरोधात जाऊन, हिंदुत्वाच्या विरोधात जाऊन ठाकरे सेनेने काँग्रेसचे पाय पकडले. काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला होता, त्यांच्यासोबतच जाऊन बसण्याचे काम त्यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काळीमा फासण्याचे काम त्यांनी केलं, असं म्हणत राम मंदिर हे एनडीए सरकारच्याच काळात झालं. 2019 ला स्वतःच्या खुर्चीसाठी हे कोणासोबत जाऊन बसले? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आता तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी लोक समजदार आहेत, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ
Comments are closed.