भिवंडीतील विषबाधा प्रकरणाची व्याप्ती वाढली; बाधितांचा आकडा आता 107 वर; ‘फेमस शोरमा’ दुकानावर तो
भिवंडी शवर्मा अन्न विषबाधा: भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ दुकानातून विकल्या गेलेल्या चिकन शोरमा, पिझ्झा, फालुदा व इतर खाद्यपदार्थांमुळे झालेल्या अन्न विषबाधेच्या (Shawarma Food Poisoning) प्रकरणातील बाधितांचा आकडा आता 107 वर पोहोचला आहे. सर्व रुग्णांवर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Bhiwandi Shawarma Food Poisoning Case)
तर दुसरीकडे‘फेमस शोरमा’ दुकानाविरोधात भिवंडी महानगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. अन्न विषबाधा प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित दुकानावरील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ‘फेमस शोरमा’सह परिसरातील इतर अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यात येत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दुकानावर कारवाई करत ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस बजावून दुकान बंद केले आहे. तपासादरम्यान दुकानाची नोंदणी व परवाना मार्च 2026 मध्येच संपुष्टात आल्याचे उघड झाले. या प्रकरणी मालक दिलशाद अन्सारी याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महापौर नारायण चौधरी व भाजप आमदार महेश चौगुले यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. या घटनेमुळे मोठी जीवितहानी होऊ शकली असती, त्यामुळे कालबाह्य परवान्यानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या संबंधित दुकानदारावर महापालिकेकडून कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला असून महापालिका अधिकाऱ्यांना महापौरांनी आदेश दिले आहेत ती लवकरात लवकर दुकानावर तोडणारा कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Shawarma Food Poisoning Case Registered : अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन मालकाविरोधात गुन्हा दाखल
या गंभीर घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने ‘फेमस शोरमा’ दुकानावर छापा टाकला. या तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या दुकानाचा अधिकृत परवाना (नोंदणी) मार्च 2026 मध्येच संपला होता. त्यानंतरही विनानोंदणी बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरू ठेवण्यात आला होता. एफडीएने दुकानातून चीज ॲनालॉग, शेझवान चटणी, टोमॅटो डिप सॉस, मेयोनीज, चिकन मिक्स मसाला आणि पिझ्झा बेसचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी जप्त केले आहेत. या निष्काळजीपणाबद्दल ‘फेमस शोरमा’चे मालक दिलशाद अन्सारी याच्याविरोधात भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि विषबाधेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एफडीए आणि शांतीनगर पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत उपचार व्यवस्थेची पाहणी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.