भिवंडीत बंडखोरी करणे भाजपच्या नगरसेवकांना भोवणार? प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी धाडली नोटीस
भिवंडी निवडणूक 2026 : चंद्रपूरनंतर अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या भिवंडी महापालिकेच्या (Bhiwandi) महापौरपदाची निवडणूक (Bhiwandi Mayor Election 2026) कि चांगलीच चर्चेत आली होती. यात अनेक राजकीय घडामोडीनंतर सेक्युलर फ्रंटचे पुरस्कृत उमेदवार नारायण चौधरी हे महापौर बनले आहेत. महापालिकेच्या स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर हात वर करुन झालेल्या मतदानात चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिलाय. महापौरपदाच्या निवडणुकीत (Bhiwandi Election 2026) ऐनवेळेस भाजपमधून (BJP) फुटून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते दाखल झाले होते. काँग्रेसनेही नारायण चौधरी यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित करत त्यांनाच मतदान करण्याबाबतचा व्हीप जारी केला होता. त्यामुळे, सेक्युलर फ्रंटचे उमेदवार बनून ते पहिल्यांचा महापौर बनले आहेत. अशातच आता भिवंडीत बंडखोरी करणे भाजपच्या नगरसेवकांना भोवणार? का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या संदर्भात बंडखोर नगरसेवकांना नोटीस पाठवल्याची माहिती आहे. (Bhiwandi Mayor Election 2026)
Ravindra Chavan : निलंबनाची कारवाई का करू नये? प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विचारला नोटीसमधून जाब
भिवंडीमधील सहा बंडखोर नगरसेवकांना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नोटीस बजावली आहे. सोबतच या 6 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई का करू नये? असा सवाल करत या नोटीसमधून जाब विचारला आहे. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असूनही भिवंडीत भाजपचे बंडखोर सत्तेवर आले आहे. भाजपचे बंडखोर नगरसेवक झाले असून नारायण चौधरी हे महापौर पदी विराजमान झाले आहेत. अशातच आता बंडखोरी केलेल्या 6 नगरसेवकांना अखेर पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस जरी करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी भाजपचे बंडखोर नगरसेवक नेमकं काय उत्तर देतात आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यावर नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महापालिकेतील 90 मतांचं गणित (Bhiwandi Mayor Election 2026)
नारायण चौधरी – ४८
काँग्रेस(Congress) – 30
राष्ट्रवादी Sh.P (NCP. SP)-
भाजप – 6
विलास पाटील – 25
कोणार्क विकास आघाडी – 4
शिवसेना – 12
समाजवादी – 6
भिवंडी विकास आघाडी – 3
स्नेहा पाटील – भाजप – 16
एक अपक्ष गैरहजर
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.