तलवारीने केक कापला, भिवंडीत बर्थडे बॉयसह मित्रावर गुन्हा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हा केक कापण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भिवंडी शहर पोलिसांनी याची दखल घेत केक कापणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला. राहुल डोळस असे गुन्हा दाखल झालेल्या बर्थडे बॉयचे नाव आहे.

बर्थडे सेलिब्रेशन कराताना दहशत पसरवण्यासाठी तलवार, कोयता, मोठ्या चाकूने केक कापण्याचे फॅड सध्या तरुण वर्गात वाढत आहे. असाच एक प्रकार भिवंडीत घडला. गणेशनगर येथील कामतघर येथे राहणाऱ्या राहुल डोळस याचा वाढदिवस होता. त्यानिमित आयोजित कार्यक्रमात राहुलचा मित्र आदित्य कदम याने वाढदिवस साजरा करत असताना केक कापण्यासाठी तलवार राहुल याच्या हातात देण्याआधी ती अगोदर हवेमध्ये गोल फिरवली होती. राहुल डोळस व त्याचा मित्र आदित्य कदम यांनी केक कापण्याच्या बहाण्याने तलवार हातात घेऊन हवेत फिरवून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात राहुल डोळस व आदित्य कदम या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.