NZvsIND 1st T20I: भुवनेश्वर कुमारने येताच रचला इतिहास! मोडला टिम साउथीचा बलाढ्य रेकॉर्ड
भुवनेश्वर कुमारने पुनरागमन करताच इतिहास रचला. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र तो सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे त्याला एकही चेंडू टाकता आला नाही. आता त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कारनामा केला. तो पूर्ण सदस्य संघांमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला.
न्यूझीलंड विरुद्ध भारत पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना आज (२२ ऑक्टोबर) क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्याप्रमाणे या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल झाले. नितीश कुमार रेड्डीने शिवम दुबेची, तर मयंक यादवने प्रिन्स यादवची जागा घेतली.
हा सामना भुवनेश्वरचा पुनरागमनाचा सामना आहे. तो 2022 नंतर पहिल्यांदाच भारतीय जर्सीमध्ये खेळला. त्याने आपल्या पहिल्याच षटकात इतिहास रचला. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या षटकात 4 धावा दिल्या. यामधील तीन चेंडू त्याने निर्धाव टाकले. त्यामुळे तो पूर्ण सदस्य संघांमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा खेळाडू ठरला.
भुवनेश्वरने T20I सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत 680 निर्धाव चेंडू टाकले. ही कामगिरी करताना त्याने साउथीला मागे टाकले, ज्याने 679 चेंडू निर्धाव टाकले होते. या यादीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे पण आहेत.
T20I सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक डॉट बॉल्स टाकणारे (पूर्ण सदस्य देश)
६८० – भुवनेश्वर कुमार*
679 – टीम साउथी
674 – रिचर्ड नागरवा
625 – शाहीन आफ्रिदी
614 – आशीर्वाद मुझाराबानी
५७६ – अर्शदीप सिंग
५६९ – जसप्रीत बुमराह
(भुवनेश्वर कुमारने T20I पॉवरप्ले NZvsIND मध्ये सर्वाधिक डॉट बॉलचा टिम साऊथीचा विक्रम मोडला)
Comments are closed.