NZvsIND: भारताचा क्राइस्टचर्चमध्ये विक्रमी धावसंख्येचा पाठलाग; न्यूझीलंडचा धुव्वा उडवला, संजू-नमन धीर ठरले विजयाचे स्टार
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाने विजयी सुरूवात केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना गुरूवारी (२२ ऑक्टोबर) खेळला गेला. क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला २२६ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते, जे भारताने २ चेंडू शिल्लक राखून पार केले.
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताचा हा विक्रमी पाठलाग ठरला.
भारताच्या या विजयाचे नायक ठरले संजू सॅमसन आणि नमन धीर. संजूने ३३ चेंडूंत ६७ धावा केल्या. तोच प्लेअर ऑफ द मॅच ठरला.
बातमी अपडेट होत आहे….
Comments are closed.