वारंवार दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयचा मोठा निर्णय! या दिग्गजाची होणार सुट्टी

भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) अनेक खेळाडूंच्या दुखापती, फिटनेस आणि दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) आढावा बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे फिजिओथेरपिस्ट कमलेश जैन (Kamlesh Jain) यांचा करार पुढे वाढवण्यात आलेला नाही. सध्या ते नोटीस कालावधीत आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ते दिल्लीला पोहोचलेले नाहीत.
फिजिओथेरपिस्ट हे संघासाठी महत्त्वाचे पद असल्याने बीसीसीआय लवकरच या पदावर नव्या फिजिओथेरपिस्टची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून खेळाडूंच्या दुखापती आणि फिटनेसबाबत कमलेश जैन यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत होते. 2022 मध्ये नितीन पटेल यांच्या जागी कमलेश जैन यांची टीम इंडियाच्या मुख्य फिजिओथेरपिस्टपदी नियुक्ती करण्यात आली होती.
खेळाडूंच्या दुखापतींचे व्यवस्थापन आणि वारंवार होणाऱ्या दुखापतींबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. खेळाडूंची खालावलेली फिटनेस पातळी आणि वारंवार होणाऱ्या दुखापतींबाबत बोर्डाने जैन यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितले होते.
इंग्लंड दौऱ्यातही भारतीय खेळाडूंना वारंवार स्नायूंमध्ये ताण येण्याची समस्या जाणवली होती. त्यामुळे संघाच्या फिटनेसबाबत चिंता निर्माण झाली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीही दुखापतींची समस्या कायम होती. नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) मांडीच्या स्नायूंमध्ये ताण आल्यामुळे मालिकेतून बाहेर झाला होता. मालिकेपूर्वी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) हे देखील फिटनेसच्या समस्येशी झुंजत होते. जसप्रीत बुमराहचा संघात समावेश ‘फिटनेसच्या अधीन’ या अटीवर करण्यात आला होता, मात्र तोही नंतर मालिकेतून बाहेर झाला.
Comments are closed.