IND vs AFG: अफगानिस्तानविरुद्ध बुमराहकडे मोठी संधी! फक्त 1 विकेट घेताच ‘या’ खास क्लबमध्ये मिळवणार स्थान

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) दोन्ही संघात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah) एक नवा विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात एक विकेट घेताच बुमराह टी-20 क्रिकेटमध्ये 350 विकेट्स पूर्ण करेल.
याआधी भारताच्या केवळ दोन गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. बुमराह बर्याच काळानंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी बुमराहने सरावादरम्यान नेट्समध्ये शानदार गोलंदाजी केली. यावेळी त्याने वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) चांगलेच अडचणीत आणले.
भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या (Yujvendra Chahal) नावावर आहे. त्याने आतापर्यंत 343 सामन्यांमध्ये 396 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे. भुवीने आतापर्यंत 332 सामन्यांमध्ये 363 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहचा विचार केला तर त्याने आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये 283 सामन्यांमध्ये 349 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात एक विकेट घेताच तो 350 विकेट्स पूर्ण करेल आणि भुवी व चहलच्या 350 विकेट्सच्या क्लबमध्ये त्याचा समावेश होईल.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज:
युझवेंद्र चहल – ३९६
भुवनेश्वर कुमार – ३६३
जसप्रीत बुमराह – ३४९
पियुष चावला – ३२९
रविचंद्रन अश्विन – ३२१
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 95 सामन्यांमध्ये एकूण 121 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत त्याच्यापेक्षा पुढे केवळ अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आहे. अर्शदीपच्या नावावर 91 सामन्यांमध्ये 135 विकेट्स आहेत. आता आगामी सामन्यांमध्ये बुमराह अर्शदीपचा हा विक्रम मोडणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. बूम-बूम बुमराहची जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्याच्याविरुद्ध धावा करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. त्यामुळे आगामी काळात त्याच्याकडे चांगली संधी असणार आहे.
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया:- श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, यश ठाकूर.
Comments are closed.