बिहारमध्ये मोठा राजकीय बदल

बिहारमध्ये मोठा राजकीय बदल

पाटणा -भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार, हे आता निश्चित झाले आहे. मंगळवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदत्याग केला. सम्राट चौधरी हे आज बुधवारी शपथग्रहण करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथेमंगळवारी दुपारी भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ शाखेची महत्वाची बैठक पार पडली. सम्राट चौधरी यांचे विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून नाव
सुचविण्यात आले. त्यांच्या नावाची सूचना विद्यमान उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल पांडे, दिलीप जयस्वालविधीमंडळ नेतेपदी, नितीश कुमार यांचा पदत्यागआणि रेणू देवी यांनी केली. उपस्थित सदस्यांनी या सूचनेला समर्थन दिल्याने रीतसर त्यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

नितीश कुमार यांचे त्यागपत्र
मंगळवारी सकाळी मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक आयाजित केली होती. या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याची औपचारिक घोषणा केली.

Comments are closed.