महाराष्ट्राचा सुपुत्र बिहारमध्ये निवडणूक लढवणार, ‘सिंघम’ थेट दोन-दोन मतदारसंघातून मैदानात उतरणा


बिहार निवडणूक 2025: बिहारमध्ये (Bihar) कधी काळी ‘सुपर कॉप’ आणि ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी आता राजकारणात जाण्याचा निर्णय घेतलाय. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर लांडे यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar Election 2025) जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघांतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आपल्या कठोर आणि प्रामाणिक प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेले लांडे आता राजकारणात परिवर्तनाची सुरुवात करू इच्छित आहेत.

शिवदीप लांडे यांनी काही काळापूर्वी ‘हिंद सेना पार्टी’ची स्थापना केली होती आणि या पक्षाच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, पक्षाची नोंदणी वेळेत न झाल्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरावे लागत आहे. अनेक मोठ्या राजकीय पक्षांकडून त्यांना तिकीट देण्याची ऑफर मिळाली होती. मात्र, स्वतःच्या नीती आणि विचारसरणीशी कधीही तडजोड करणार नाही, असे शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे.

Bihar Election 2025: भ्रष्टाचाराविरोधात लढा हेच ध्येय: लांडे

शिवदीप लांडे म्हणाले की, त्यांच्या राजकारणाचा मुख्य उद्देश जनतेची सेवा करणे आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देणे हा आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना त्यांनी बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये काम करत गुन्हेगारी आणि माफियाविरोधात कठोर पावले उचलली, यामुळेच त्यांना तरुणांमध्ये ‘सिंघम’ म्हणून ओळख मिळाली. आता हीच प्रतिमा घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत.

Bihar Election 2025: जमालपूर आणि अररियातून लढणार विधानसभेची निवडणूक

शिवदीप लांडे यांनी जमालपूर आणि अररिया या दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, कारण या दोन्ही भागांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि त्यांनी अनेक वर्षे या ठिकाणी पोलीस दलात सेवा बजावली आहे. या निर्णयाबाबत लांडे म्हणाले की, हे क्षेत्र विकासापासून खूपच दूर आहे आणि आजही जनता मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहे. त्यांच्या मते, जर जनतेने त्यांना संधी दिली, तर ते शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतील.

Bihar Election 2025: लांडे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, अपक्ष उमेदवार म्हणूनही शिवदीप लांडे यांची लोकप्रियता त्यांना मतं मिळवून देऊ शकते. एकंदरीत, त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे बिहारची विधानसभा निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, मात्र त्यांची निवड बिहार कॅडरमधून आयपीएस अधिकारी म्हणून झाली होती.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला ‘रामराम’

आणखी वाचा

Comments are closed.