30 नोव्हेंबरपासून पालिका सभागृहात नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आता नगरसेवकांच्या उपस्थितीवर बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. नगरसेवक सभागृहात किती वेळ उपस्थित राहतात, याची नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनाही आपल्या लोकप्रतिनिधीच्या कामकाजातील सहभागाची माहिती मिळू शकणार आहे.

पालिका सभागृहाची सध्याची जागा अपुरी पडत असल्याने सभागृहात प्रवेश आणि बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सभागृहाच्या कामकाजासाठी विविध अधिकारी, एमएस  अधिकारी तसेच पत्रकार उपस्थित राहत असतात. त्यामुळे कोणाला सभागृहात प्रवेश द्यायचा, याबाबतही नियोजन करण्यात येणार आहे. नियमितपणे कामकाजासाठी उपस्थित राहणारे पत्रकार आणि संबंधित अधिकाऱयांनाच प्रवेश देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले.

Comments are closed.