ट्रॅक्टर कालव्याच्या चारीत कोसळला; आई-मुलीचा मृत्यू; विहिर खोदकामादरम्यान काळाचा घाला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विहिरीच्या खोदकामासाठी आलेल्या आई आणि मुलीवर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर कालव्याच्या चारीत कोसळला. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव शिवारातील वाघमारे वस्ती परिसरात घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आई करिश्मा जाधव आणि मुलगी अर्चना जाधव (रा. नाथापूर, जि. बीड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या माय-लेकीचे नाव आहे.

माहिजळगाव शिवारातील वाघमारे वस्ती परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू होते. या कामासाठी आई करिश्मा जाधव ट्रॅक्टर चालवत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अर्चना हीदेखील ट्रॅक्टरमध्ये बसलेली होती. दरम्यान, ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना करिश्मा यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर कालव्याच्या चारीत जाऊन कोसळला. यामध्ये करिश्मा आणि अर्चना या दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मिरजगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जंझाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणले.

बीड जिल्ह्यातील नाथापूर येथील रहिवासी असलेल्या मायलेकींचा कर्जत तालुक्यातील माहिजळगाव शिवारात अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments are closed.