‘माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं’, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपची टीका, म्हणाले,
मटणवरील सुप्रिया सुले: माझ्या पांडुरंगाला मी मटण (Mutton) खाल्लेलं चालतं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपकडून (BJP) टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कोणी काय खावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पिढ्यानुपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या आम्हा वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला (Pandurang) तुम्ही मांसाहार (Non Veg Food) केलेला चालतो, हे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करु शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण मौलाना शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशी बोचरी टीका भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली. या टीकेला आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले की, याचं उत्तर मी देणार नाही. याचं उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी देतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
सुप्रिया सुले: सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे या शनिवारी दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मांसाहार सेवनाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल त्यांनी विचारला. 50 वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, हे खरं पुरोगामित्व असल्याचे सुळे म्हणाल्या. 10 वेळेस वेळ मागून देखील मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो असेही सुळे म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे जाहीर आभार देखील मानले.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते सरसकट कर्जमाफी देतो. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून फक्त राष्ट्रवादी शदर पवार गटाचे खासदार अमित शाह यांच्याकडे गेले होते. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्यामुळे मी मागणंच बंद केलं आहे. दहा वेळा आपण वेळ मागतो पण वेळ देत नाहीत याचा अर्थ काय, त्यांना वेळ द्यायचा नाही असे सुळे म्हणाल्या. मी ठरवलं आहे, इथे काम करत नाही ना, माझी कामं दिल्लीत होतात, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=0ZMV0UTALFI
आणखी वाचा
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल
आणखी वाचा
Comments are closed.