मकवानी, कनोजिया, पटेल, शर्मा, मुंबईत भाजपाच्या पहिल्या यादीत 19 नॉन मराठी नावं; ठाकरे सेनेचा ह

भाजप उमेदवार यादी बीएमसी निवडणूक 2026 मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) भाजपाकडून पहिली 66 नावांची यादी जाहीर (Mumbai BJP Candidate List) करण्यात आली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन, आकाश पुरोहित यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील दोन जणांचा देखील संधी मिळाली आहे. मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांना पुन्हा भाजपाकडून संधी देण्यात आली आहे. मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर 2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आहेत. तर भाजपाच्या 66 जणांच्या यादीत 19 नॉन मराठी लोकांचाही समावेश आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. (BMC Election BJP Candidate List)

भाजपच्या 66 जणांच्या यादीत – 19 नॉन मराठी-

वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
प्रभाग क्रमांक २३ – शिवकुमार झा
वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
प्रभाग क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
प्रभाग क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
प्रभाग क्रमांक ४७ – तेजिंदर सिंग तिवाना
प्रभाग क्रमांक ५८ – संदीप पटेल
वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
प्रभाग क्रमांक 69 – सुधा सिंह
वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
प्रभाग क्रमांक 72 – ममता यादव
वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
प्रभाग क्रमांक 122 – चंदन शर्मा
प्रभाग क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया
वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
प्रभाग क्रमांक 221 – आकाश पुरोहित

शिवसेना ठाकरे गटाचा हल्लाबोल-

भाजपाच्या यादीवरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखित्र चित्रे यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या यादीतील अमराठी लोकांची नावं लिहून आता कळलं असेलच…भाजपा छातीठोक पण का नाही सांगत की मुंबईचा महापौर मराठीच असेल, असा हल्लाबोल केला आहे. तसेच ही लढाई फक्त मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी नव्हे तर मुंबईत महाराष्ट्र टिकविण्यासाठी लढत आहोत, मुंबईकरांनो आम्हाला ह्या लढ्यात तुमची साथ हवी, असंही अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी- (BJP Candidate List BMC Election 2026)

1. वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर
2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर
3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
8. प्रभाग क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे
9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
11. प्रभाग क्रमांक 23 – शिवकुमार झा
12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
14. प्रभाग क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा
15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
16. प्रभाग क्रमांक 43 – विनोद मिश्रा
17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी
18. प्रभाग क्रमांक 47 – तेजिंदर सिंग तिवाना
19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम
20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
21. प्रभाग क्रमांक 58 – संदीप पटेल
22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
23. प्रभाग क्रमांक 60 – सायली कुलकर्णी
24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
२६. प्रभाग क्रमांक ६९ – सुधा सिंग
27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
28. प्रभाग क्रमांक 72 – ममता यादव
29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत
32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
37. प्रभाग क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर
38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती
40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग
43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
45. प्रभाग क्रमांक 122 – चंदन शर्मा
46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
47. प्रभाग क्रमांक 127 – अलका भगत
48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते
49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर
54. प्रभाग क्रमांक – 174 – साक्षी कनोजिया
55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत
59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील
61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले
62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
64. प्रभाग क्रमांक 221 – आकाश पुरोहित
65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

  1. नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  2. नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  3. उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  5. मतदान- 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

संबंधित बातमी:

Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची 42 जणांची यादी; सुतार, वाडकर, फणसे, सावंत…कोणाकोणाला संधी?

आणखी वाचा

Comments are closed.