मोठी बातमी! भाजपचं पुन्हा एकदा धक्कातंत्र, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या न
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून (BJP) उपराष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी कोणाला दिली जाईल, याची चर्चा देशभरात रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र देत उपराष्ट्रपदीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नाद्डा (जेपी नद्दा) यांनी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
भाजपनं उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव निश्चित केलं आहे. सीपी राधाकृष्णन यांना एनडीएनं उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील राज्यपाल पदावरुन उपराष्ट्रपती बनले होते. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल देखील होते. यापूर्वी राधाकृष्णन यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल होते. सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री जितन राम मंजी (@jitanrmmnjhi) पोस्ट्स,
“आम्हाला उपराष्ट्रपतींच्या एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही घराच्या रस्त्यापासून एनडीएकडे आहोत.” pic.twitter.com/35iteo6osh– प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@pti_news) 17 ऑगस्ट, 2025
आणखी वाचा
Comments are closed.