Video: मी नाराज नाही, पण…; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमध्ये (BJP) आज माजी आमदार, माजी महापौरासह 5 मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश संपन्न झाले. या पक्षप्रवेशावर नाशिकमधीलच (Nashik) भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत. भाजप आमदार देवयानी फरांदे. यांनी या पक्षप्रवेला अनुपस्थित राहत विरोध केला होता. मात्र, तरीही मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रवेश झाले. यावेळी, मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशााठी भाजप कार्यालयात येत असताना, भाजपच्या निष्ठावंतांनी त्यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातला होता. आता, देवयानी फरांदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते.

नाशिकमधील पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची परस्थिती निर्माण झाली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक आमदार खासदार भाजपचे आहेत. आज दिनकर पाटील यांनी प्रवेश केला आहे, दिनकर पाटील यांनी आता कुठे जाऊ नये, असे या पक्षप्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी म्हटले. मनसे, काँग्रेस, उबाठाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे प्रवेश केला आहे, मी सर्वांचे स्वागत करतो. मुख्य प्रवाहात त्यांनी प्रवेश केला आहे, भाजपवर विश्वास आहे, नेतृत्वार विश्वास आहे, त्यामुळे या सर्वांनी प्रवेश केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व आले आहेत, बाहेर आता कोणीही राहिले नाही. 100 च्या वर आमचे नगरसेवक निवडून येतील, आता चार वाढल्याने 104 होतील, असेही महाजन यांनी म्हटले. तर, देवयानी फरांदे यांनी मी नाराज नाही असे म्हटले, पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू लपले नाहीत.

मी विरोध करण्यापेक्षा ते माझे मत होते, बबलू शेलार यांचा प्रेवश केला होता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आमचं पॅनल तयार होतं. आमदार म्हणून मला वाटत होते ते मी बोलले, कोणाला माझा विरोध नव्हता, असे म्हणत भाजप नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, मी नाराज नाही असे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते. मागील 40 वर्षांत मी स्वतःसाठी आजवर कधीही जाहीर भूमिका घेतली नाही, मी पक्षाची निष्ठावान आहे. सर्वानीच नेते व्हायचे आहे, मग कार्यकर्ते कोण राहणार हे मला वाटतं, असेही देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या गोंधळावर आणि नाराजीवर बोलताना म्हटले.

कोणालाही न जुमानता पक्षप्रवेश – राऊत

सगळ्यात मोठं पक्ष भाजप आहे, गौतम अदानी सुद्धा भाजप सदस्य आहेत. इतरांचे आमदार, खासदार, नेते आपल्या पक्षात हे सगळं असताना घेणं म्हणजे श्रीमंत भिकाराच्या लक्षण आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी नाशिकमधील भाजप प्रवेशावर सडकून टीका केली. देवयानी फरांदे रस्त्यावर उतरल्या आहेत. कोणालाही न जुमानता इतर पक्षच्या लोकांना हे सोबत घेतात. देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये इतरांवर भ्रष्टाचारचे आरोप करत होते, आत्ता हे गिरीश महाजन आपली गँग बनवत आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमधील पक्षप्रवेशावरुन भाजपला टोला लगावला.

हेही वाचा

गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.