राज ठाकरेंनंतर भाजपकडून ‘लाव रे तो’ व्हिडीओ; आशिष शेलारांनी मतदारयादीबाबत मोठा बॉम्ब फोडला, ‘व्
आशिष शेलार: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपांवरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावर मुंबईत नुकताच ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. या मोर्चादरम्यान आपल्या राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांविरोधात थेट “खळखट्याक” करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यापूर्वी त्यांनी “लाव रे तो व्हिडीओ” म्हणत राज्य सरकारवर टीका केली होती. आता त्याच वाक्याचा आधार घेत भाजपनेही प्रत्युत्तर दिले असून ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली
मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत, “गळा मतचोरीचा… पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!” अशी टीका केली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत “महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला,” असे त्यांनी म्हटले. तर राज ठाकरे व्होट जिहाद करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला.
Ashish Shelar on Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीवर ‘व्होट जिहाद’चा आरोप
शेलार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली गेली आणि हे पाप महाविकास आघाडीने केले. हा एक सुनियोजित ‘व्होटजिहाद’ होता. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता. आज या सर्वांचा भंडाफोड आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीने केलेले प्रताप सांगण्यासाठीच आजची पत्रपरिषद असल्याचे त्यांनी सांगितले.
Ashish Shelar: दुबार मतदारांचा मुद्दा पुढे
पत्रकार परिषदेत शेलार यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, “आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण केले असून, त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर ही संख्या 16 लाख 84 हजार 256 इतकी असेल.” ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या आहे. यात महाविकास आघाडीचे समर्थक नाहीत. ती आणखी कितीतरी मोठी असू शकते.
Ashish Shelar: उदाहरणे देत आघाडीवर टीका
शेलार यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे मतदारसंघ दाखवत उदाहरणे दिली.
कर्जत-जामखेड : रोहित पवार — ५,५३२ दुबार मुस्लिम मते
साकोली : नाना पटोले — ४७७ दुबार मुस्लिम मते
वांद्रे पूर्व : वरुण सरदेसाई — १३,३१३ दुबार मुस्लिम आणि ख्रिश्चन मते
मुंब्रा : जितेंद्र आव्हाड — ३०,६०१ दुबार मुस्लिम मते
लातूर शहर : अमित देशमुख — २०,६१३ दुबार मुस्लिम मते
“महाविकास आघाडी आणि मनसे फक्त मराठी नावांचा उल्लेख का करतात? ही नावे का घेत नाहीत?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
Ashish Shelar: बुरख्याआडचे राजकारण
कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही मतदारांची उदाहरणे देत त्यांनी सांगितले की, “एकाच फोटोखाली वेगवेगळी नावे दाखवून मतदारांची नोंद करण्यात आली आहे. हा महाविकास आघाडीचा मोठा घोटाळा असून ‘बुरख्याआड राजकारण’ सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Ashish Shelar on Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विचार करावा
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ देखील दाखवला. ते म्हणाले राज ठाकरेंनी तर तीन कथित दुबार मतदारांची नावे घेतली. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी येथील मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले, असे त्यांनी सांगितले. जी नावे त्यांनी सांगितली ती आहेत, प्रभाकर तुकाराम पाटील, राम मधु भोईर, गजानन पुंडलिक भोईर हे आहेत. तृष्टीकरणाचा कळस त्यांनी गाठला. राज ठाकरे यांना हिंदू आणि दलित दुबार मतदार दिसतात. अडनाव म्हणून तुम्ही दुबार फटकवा म्हणतात. राज ठाकरे म्हणतात टेंम्पोभर पुरावे आणलेत. मग आमच्याकडे हे पुरावे आहेत हे हवेत विरले का? यालाच आम्ही व्होट जिहाद म्हणतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे भूमिका बदला भले नका येऊ आमच्या सोबत पण उघडा डोळे पाहा निट. राज ठाकरे आणि हिंदुत्व सोडलेले उद्धव ठाकरे यांनी आता या ‘व्होट जिहाद’च्या कटाचा विचार करावा, असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.