बिहारमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

वृत्तसंस्था / भागलपूर

बिहारमधील भागलपूरमध्ये गुन्हेगारांनी एका भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना बरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुतुबगंज परिसरात घडली. मृताची ओळख उमा भूषण तांती अशी पटली असून, ते भाजपचे मंडळ अध्यक्ष होते. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्याजवळ गोळी झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला.  गोळीबारानंतर त्यांना मायागंज रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. घटनेचे कारण सध्या अस्पष्ट आहे. काली पूजेसाठी गोळा केलेल्या देणगीवरून वाद झाल्याचे वृत्त आहे. याच वादातून हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार रोहित पांडे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

 

Comments are closed.