माधव भंडारींकडून 26/11 च्या हल्ल्यासंदर्भाने राष्ट्रवादीवर आरोप; अमोल मिटकरींची बोचरी टीका
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील 26/11 (Mumbai) चा हल्ला रोखण्यास काँग्रेस अपयशी ठरले हे मी त्यावेळी देखील बोललो होतो आणि आजही बोलतो आहे. त्यावेळी त्यांनी प्रेस नोट काढली होती. मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात 5 महिन्यांपूर्वीच सरकारला माहिती होती. मात्र, ते थांबवयला अपयशी ठरले, असा गंभीर आरोप भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचं जरी सरकार होतं तरी जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्राची होती. त्यामुळे, याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही माधव भंडारी यांनी केली आहे. माधव भंडारी (माधव भंडारी) यांच्या वक्तव्यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, अजित पवारांनी याप्रकरणी चौकशी करावी, केंद्रात व राज्यात आपलंच सरकार आहे, असे म्हटलं.
अजित पवार म्हणाले तसं त्यांनी आता या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे सत्य समोर आल पाहिजे, अशी मागणीच माधव भंडारी यांनी केली आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावरून राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या माधव भंडारींवर राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केला. भंडारी यांची मानसिक स्थिती ढासळली आहे, त्यांना उपचाराची गरज असल्याचा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. उतारवयात विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याय. त्यांच्या उपचारासाठी काही सहकार्य लागलं तर राष्ट्रवादी तन-मन-धनाने भंडारींना सहकार्य करणार आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी माधव भंडारींवर बोचरी टीका केली. भंडारींना पक्षात कोणीच विचारत नाहीय. ते आऊटडेटेड झालेली बॅटरी असल्याचा टोला देखील मिटकरी यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते माधव भंडारी
मुंबई शहरावर झालेल्या 26/11 रोजीच्या हल्ल्यात तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा हात होता. 26/11 चा मुंबईवरील हल्ला होणार असल्याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय इतका मोठा हल्ला घडणे अशक्य आहे, असे खळबळजनक वक्तव्य माधव भंडारी यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यावरुन, आता वाद निर्माण झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रत्त्युतर देण्यात येत आहे.
त्यांच्याकडे कुठला पुरावा – वडेट्टीवार
रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भंडारी यांच्या आरोपावर पलटवार केला आहे.
हेही वाचा
हंडाभर गढूळ पाण्यासाठी ‘लाडक्या बहिणी’ची वणवण; कुठंय मिशन ‘जल’जीवन? पाहा फोटो
अधिक पाहा..
Comments are closed.