अजित पवार जनाची नाही तर मनाची तर ठेवा, भाजपचे मंत्री शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांवर घसर
धाराशिव: जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजेच अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार जनाची नाही तर मनाची तर ठेवा, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी अर्थमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्यावरती टीका करत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार यांच्यावर देखील घसरले. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्याला जीवदान दिले त्यांचे कारखान्याच्या सभेत अभिनंदनाचे बॅनर फोटो तरी लावा, असं म्हणत अजित पवारांवर टीका केली आहे.
जाणता राजाने फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवला
राधाकृष्ण विखे पाटील हे शरद पवार यांच्यावर टीका करताना अजित पवार यांच्यावरही घसरले आहेत. आमच्या राज्याचे जाणता राजा यांनी लोकांच्या घरात फोडाफोडीचे आतापर्यंत काम केले. लोकांना उपाशी ठेवण्याचे पाप या जाणत्या राजाने केले असल्याची टीका शरद पवार यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील हे करत असताना ते अजित पवार यांच्यावर यांच्यावरही घसरले, अजित पवार जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, अशा तिखट शब्दात अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. अजित पवारांवर टीका करताना विखे पाटलांनी पंतप्रधानांनी व गृहमंत्र्यांनी साखर कारखानदाराला मदत केल्याचा दाखला देत ही टीका केली आहे.
साखर कारखानदारी इथेनॉलला जीवनदान देऊन जिवंत केली, त्यांनी कारखानदाराला नाही तर आपल्याला जीवनदान दिले अशा जीवनदान देणारे नेत्यांचे व पंतप्रधानाचे फोटो बॅनर वर लावले जात नाहीत, किंवा कारखान्याच्या सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला जात नाही. जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी असं वक्तव्य करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तर शरद पवार यांना जाणता राजाची उपाधी देत जाणता राजांनी फोडाफोडीचे राजकारण करत लोकांची घर फोडण्याचं काम केलं, यात मात्र महाराष्ट्र उपाशी ठेवला असे वक्तव्य करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांना संबोधित करताना साखर धोरणावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारावर टीका केल्याने आता सत्ताधारी नेत्यांमध्येच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.